Saturday, April 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शिक्षण विभागातील थकीत बिलांवरून आ.आसगावकर आक्रमक ; शालार्थ’ ते पीएफ प्रश्नांवर तत्काळ निर्णय

तरुण भारतbyतरुण भारत
April 1, 2026
in editor
0
शिक्षण विभागातील थकीत बिलांवरून आ.आसगावकर आक्रमक ; शालार्थ’ ते पीएफ प्रश्नांवर तत्काळ निर्णय
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 सोलापूर – राज्यातील शिक्षकांची थकीत बिले आणि प्रलंबित प्रशासकीय कामांवरून शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी सोमवारी आक्रमक भूमिका घेत शिक्षण विभागाला धक्का दिला. पुणे येथील शिक्षण संचालक कार्यालयात दिवसभर ठाण मांडत त्यांनी थकीत बिलांचा सखोल आढावा घेतला आणि “संचालक स्तरावरील सर्व बिले आजच्या आज मार्गी लावा,” असे स्पष्ट निर्देश शिक्षण संचालक महेश पालकर यांना दिले. या धडक कारवाईमुळे शिक्षण खात्यात मोठी खळबळ उडाली आहे. 

       अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिक्षण मंत्र्यांनी ३१ मार्चपूर्वी सर्व थकीत बिले देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात अनेक प्रकरणांमध्ये प्रशासनाकडून अपेक्षित गतीने काम होत नसल्याची बाब आमदार आसगावकर यांनी अधोरेखित केली. “अधिकारी ऐनवेळी बिलांमध्ये किरकोळ त्रुटी दाखवून ती प्रलंबित ठेवतात, ही अत्यंत गंभीर बाब आहे,” असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.यावेळी त्यांनी हेतुपुरस्सर बिले अडवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही ठामपणे मांडली. शिक्षकांच्या हक्काच्या देयकांमध्ये विलंब होणे अस्वीकार्य असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून दिली.

केवळ थकीत बिलांपुरते मर्यादित न राहता, आमदार आसगावकर यांनी शिक्षकांच्या इतर जिव्हाळ्याच्या प्रश्नांवरही लक्ष केंद्रित केले. शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे यांना प्रलंबित ‘शालार्थ आयडी’ तातडीने देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या आयडीअभावी अनेक शिक्षकांना वेतन व इतर शासकीय सुविधा मिळण्यात अडथळे येत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

   तसेच, कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षकांना भेडसावणाऱ्या भविष्य निर्वाह निधी (पीएफ) बिलांच्या समस्येवरही त्यांनी थेट हस्तक्षेप केला. आमदार आसगावकर यांच्या सूचनेनंतर शिक्षण संचालक महेश पालकर यांनी कोल्हापूर वेतन पथक अधीक्षकांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत पीएफ बिले तातडीने मंजूर करण्याचे निर्देश दिले.या सर्व घडामोडींमुळे शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत प्रशासनावर दबाव निर्माण झाला असून, आगामी काळात या प्रश्नांच्या निवारणाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शिक्षकांच्या हक्काच्या देयकांसाठी आमदार आसगावकर यांनी घेतलेला आक्रमक पवित्रा हा शिक्षण विभागासाठी इशारा मानला जात आहे.

 

शिक्षकांचे प्रश्न ‘ऑन द स्पॉट’ निकाली या बैठकीवेळी पुणे आणि कोल्हापूर विभागातून मोठ्या संख्येने शिक्षक बांधव उपस्थित होते. शिक्षकांनी आपले वैयक्तिक आणि सामूहिक प्रश्न आमदार जयंत आसगावकर यांच्यासमोर मांडले. यावेळी त्यांनी संचालक, उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी यांच्याशी थेट संवाद साधून अनेक तांत्रिक प्रश्न जागेवरच निकाली लावले.

 

आमदार जयंत आसगावकर यांच्या या ‘ॲक्शन मोड’मुळे अनेक महिन्यांपासून रखडलेल्या फायलींना गती मिळाली असून, ३१ मार्चच्या अखेरीस शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या बैठकीत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे शिक्षक संघटनांनी समाधान व्यक्त केले आहे.

Post Views: 15
Previous Post

अनाधिकृत ढाचा तातडीने पाडा, हिंदू समाजाचे प्रशासनाला निवेदन

Next Post

एलपीजी गॅसचा तुटवडा; पुरवठा सुरळीत न झाल्यास  चक्का जाम आंदोलनाचा इशारा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
एलपीजी गॅसचा तुटवडा; पुरवठा सुरळीत न झाल्यास  चक्का जाम आंदोलनाचा इशारा

एलपीजी गॅसचा तुटवडा; पुरवठा सुरळीत न झाल्यास  चक्का जाम आंदोलनाचा इशारा

ताज्या बातम्या

मंठा येथील कृषी सेवा केंद्र चालकांचा बेमुदत बंद आंदोलन

April 25, 2026

पारध येथे मानव एकता दिनी भव्य सत्संग

April 25, 2026

खरीप हंगाम पूर्व भाजीपाला रोपवाटिकांची कृषी विभागाच्या वतीने तपासणी

April 25, 2026

सोलापुरात जमीन खरेदीच्या नावाने बिल्डरची एक कोटींची फसवणूक

April 25, 2026

कॅनरा बँकेत ७.३१ कोटींचा मोठा अपहार; अधिकाऱ्यासह तिघांवर गुन्हा , २ आरोपी अटकेत

April 25, 2026

क्रीडा लेखकाच्या भेटीने भारावले विद्यार्थी

April 25, 2026

संस्कारांमुळेच जीवनाचा आध्यात्मिक मार्ग सुकर होतो

April 25, 2026

संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात जागतिक वसुंधरा दिन उत्साहात साजरा

April 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0829251

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697