सांगोला – व्यसनमुक्त युवक संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून दिला जाणारा राष्ट्रबंधू राजीव दीक्षित पुरस्कार मेडशिंगी (ता.सांगोला) येथील बसवेश्वर गुंडाप्पा झाडबुके यांना किल्ले साल्हेर जि.नाशिक गडाच्या पायथ्याशी युवकमित्र हभप.बंडातात्या कराडकर यांचे शुभहस्ते देऊन गौरविण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीरसेनानी सूर्याजी काकडे यांचे वंशज संतोषआबा काकडे होते. यावेळी सोलापूर, सातारा, पुणे, अहिल्यानगर, नाशिक, बीड या भागातील संघटनेचे शिलेदार व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलासबाबा जवळ यांनी केले. आभार शहाजी काळे यांनी मानले. बसवेश्वर झाडबुके हे शहीद राजीव दीक्षित यांचे सोबत सक्रिय राहून स्वदेशीचे काम करीत होते. अतिशय साधी राहणी व स्वदेशीचा विचार यामुळे ते परिसरात चर्चेत आहेत. व्यसनमुक्तीच्या माध्यमातून ते शाळा महाविद्यालय या ठिकाणी जाऊन व्यसनमुक्तीचा व स्वदेशीचा प्रचार करत आहेत.
Post Views: 5