Saturday, June 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अधिक मासानिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांचा जनसागर

तरुण भारतbyतरुण भारत
May 27, 2026
in west maharashtra
0
अधिक मासानिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांचा जनसागर
0
SHARES
32
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट – तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीत अधिक मासानिमित्त परगावच्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे . श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी तसेच महाप्रसादासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. विशेषतः श्री स्वामी समर्थ मंदिर व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ परिसर भक्तांनी फुलून गेला आहे . दररोज हजारो भाविक महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. शनिवार रविवार रोजी १ लाखा पेक्षा अधिक भाविकांनी महाप्रसाद भोजनाचा लाभ घेतला .
हिंदू धर्मात अधिक मासाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. देवदर्शन, जप-तप, दानधर्म आणि अन्नदान यांना अधिक मासात विशेष पुण्य मानले जाते. याच पार्श्वभूमीवर देशभरातील स्वामीभक्त अक्कलकोट येथे दाखल होत आहेत. गुरुवार, शनिवार आणि रविवार या दिवशी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबाद, विदर्भ, मराठवाडा, खानदेश, सातारा, सांगली आदी भागांसह देशाच्या विविध राज्यांतून भाविक अक्कलकोटमध्ये येत आहेत.
दर्शनासाठी आलेले हजारो भाविक श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात महाप्रसादाचा लाभ घेत असून गुरुवार, शनिवार व रविवार या दिवशी तब्बल ३५ ते ४० हजार भाविक दोन वेळा महाप्रसाद घेत असल्याची माहिती मिळाली. श्री स्वामी समर्थांचे दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेत भाविक समाधान व्यक्त करत आहेत.
दरम्यान, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ परिसरात मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात आली आहेत. तात्पुरत्या स्वरूपातील महाप्रसादगृहाचे रूपांतर आता भव्य आणि देखण्या दरबार हॉलमध्ये झाले आहे. हॉलमधील आकर्षक झुंबरे, नक्षीदार सीलिंग आणि प्रकाशयोजना भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत.
याशिवाय मान्यवर अतिथींसाठी स्वतंत्र आश्रयदाते कक्ष, व्हीव्हीआयपी सूट, महाप्रसाद कक्ष तसेच लिफ्टची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. परिसरात डांबरीकरण व काँक्रिटीकरणाची कामेही पूर्ण करण्यात आली आहेत.
महाप्रसादगृहासमोर कपीला गाय, भव्य दीपमाला, श्री स्वामी समर्थांची २५ फूट उंच मूर्ती, “वारुळातून प्रकटले स्वामी” मूर्ती, मार्गदर्शक एलईडी बोर्ड अशी आकर्षक निर्मिती करण्यात आली आहे. गणेश मंदिरालगत उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा १२ फूट उंच अश्वारूढ पुतळा, त्याभोवती उभारलेली गड-किल्ल्यांची शिवसृष्टी आणि सुंदर बालउद्यान भाविक व स्थानिक नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
परगावच्या भाविकांसाठी महाप्रसादासह निवासाचीही उत्तम व्यवस्था अन्नछत्र मंडळात करण्यात आली आहे. संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले, सचिव शामराव मोरे, उपाध्यक्ष अभय खोबरे, विश्वस्त मंडळ, कर्मचारी व सेवेकरी वर्ग भाविकांच्या सेवेसाठी परिश्रम घेत आहेत.
अधिक मासाच्या पार्श्वभूमीवर श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात भक्तिभाव, सेवा आणि अन्नदानाचा अनोखा संगम अनुभवायला मिळत असून स्वामीभक्तांची मांदियाळी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
Post Views: 87
Previous Post

जगाच्या अस्तित्वासाठी शिव आणि शक्तीचा संगम अत्यावश्यक

Next Post

कोळेगाव धरणातून सीना नदीत पाणी सोडण्याची शिंदे सेनेच्या मुन्ना साठेंची मागणी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

कोळेगाव धरणातून सीना नदीत पाणी सोडण्याची शिंदे सेनेच्या मुन्ना साठेंची मागणी

ताज्या बातम्या

चीन मध्ये कोळश्याच्या खाणीत स्फोट…९० कर्मचार्यांचा जागीच मृत्यू #viral #internationalnews

June 12, 2026
लोकनाथ मीडिया चषक स्पर्धेचे शानदार उद्घाटन

लोकनाथ मीडिया चषक स्पर्धेचे शानदार उद्घाटन

June 12, 2026

शेअर बाजारातील १ कोटी ८१ लाखांच्या नुकसानीतून उद्ध्वस्त झाला हसता-खेळता संसार!

June 12, 2026

शिव्या दिल्याचा जाब विचारल्याने तरुणास लोखंडी रॉड व लाथा बुक्याने मारहाण

June 12, 2026

शेतातील कचऱ्यापासून तयार नवीकरणीय डिझेलचा वाहनात यशस्वी प्रयोग

June 12, 2026

बुरलेवाडी येथील मजुराच्या मुलाची जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्ण झेप

June 12, 2026

अफकॉन्सच्या सीएसआर उपक्रमामुळे 94 कर्करोगग्रस्त बालक व पालकांच्या जीवनात नवी उमेद

June 12, 2026

रोजगार, बेरोजगारी व असंघटित क्षेत्राची माहिती संकलित होणार

June 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

byतरुण भारत
June 11, 2026
0

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0906934

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697