
सोलापूर : जोडभावी पेठेतील जय भारत समाजसेवा नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने श्री नवदुर्गा माता मंदिरात अधिक मासानिमित्त आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमांना रविवारी प्रारंभ झाला. यावेळी श्री गुरु संस्थान मठ गौडगावचे श्री. ष. ब्र. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण व गोमातेचे पूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना महास्वामीजी म्हणाले की, जग चालविणाऱ्या पंचमहाभूतांमध्ये शक्ती देवीचे अस्तित्व असून जगाच्या अस्तित्वासाठी शिव आणि शक्तीचा संगम कायम राहणे आवश्यक आहे. जल, आकाश, वायू, पृथ्वी आणि अग्नी या पंचमहाभूतांवरच सृष्टीचा आधार असल्याचे त्यांनी सांगितले. पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती, जलामध्ये पिंडीकरण शक्ती, अग्नीमध्ये दाहक शक्ती, वायूमध्ये स्पंदन शक्ती आणि आकाशामध्ये ध्वनी आकर्षण शक्ती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
श्री नवदुर्गा माता जागृत देवी असून सोलापूरकरांनी मंदिरातील देवीचे दर्शन घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी श्री वेदमूर्ती विजयकुमार स्वामी (शास्त्री) यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमास सिद्धेश्वरन नाडार, संजय होमकर, भीमाशंकर पद्मगोंडा, नगरसेवक अक्षय अंजीखाने, उमेश उळागड्डे, नागेश होंड्राव, बाळासाहेब वाघमोडे, नरेंद्र होमकर, चंद्रकांत कलशेट्टी, रमेश उळागड्डे, गुरुराज पदमगोंडा, ऋतुराज वाघमोडे आदी उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुलोचना हवले, महानंदा कलशेट्टी, सुमन बुद्धे, वनजा नाडार, पुनम होमकर, अनिता वाघमोडे, महानंदा अल्लोळी, माधुरी बुद्धे, शैलजा बुद्धे, लक्ष्मी गावडे, आरती पद्मगोंडा आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सागर अतनूरे यांनी केले.






















