Tuesday, September 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सौंदरे येथे पाझर तलावातून अवैध मुरूम उत्खननावर कारवाई

तरुण भारतbyतरुण भारत
June 9, 2026
in crime
0
सौंदरे येथे पाझर तलावातून अवैध मुरूम उत्खननावर कारवाई
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
बार्शी – तालुक्यातील सौंदरे गावाच्या हद्दीतील पाझर तलावातून अनधिकृतपणे मुरुम उत्खनन सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर महसूल विभागाच्या पथकाने धाड टाकून जेसीबी, हायवा आणि मुरुम असा तब्बल २२ लाख ३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत ग्राम महसूल अधिकारी रविनंद भागवत मोहिते (रा. भीमनगर, बार्शी) यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. ते मागील दोन वर्षांपासून सौंदरे येथे ग्राम महसूल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, सोमवार दि. ८ जून रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास बार्शी-सोलापूर रोडवरील कोळेकर पेट्रोल पंपाच्या पाठीमागे असलेल्या सौंदरे गावच्या पाझर तलाव परिसरात जेसीबी व हायवाच्या सहाय्याने अवैध मुरुम उत्खनन सुरु असल्याची गोपनीय माहिती महसूल विभागाला मिळाली होती.
या माहितीच्या आधारे ग्राम महसूल अधिकारी रविनंद मोहिते यांनी घटनास्थळी भेट दिली असता, जेसीबीच्या सहाय्याने टाटा कंपनीच्या हायवामध्ये अंदाजे ६ ब्रास मुरुम भरल्याचे आढळून आले. चौकशीदरम्यान जेसीबी चालकाने आपले नाव गणेश विठ्ठल बसागरे (रा. घारी, ता. बार्शी) तर हायवा चालकाने लक्ष्मण राजाराम काळे (रा. दडशिंगे, ता. बार्शी) असे सांगितले.
दोन्ही वाहनांचे मालक सत्यवान भाऊसाहेब पाटील (रा. सौंदरे, ता. बार्शी) असल्याचे समोर आले. त्यांच्याकडे उत्खननासाठी आवश्यक परवानगी व रॉयल्टीबाबत विचारणा केली असता कोणतीही वैध परवानगी नसल्याचे निष्पन्न झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
त्यानंतर तहसीलदार बार्शी यांच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या तालुकास्तरीय पथकाच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. सहाय्यक महसूल अधिकारी ए. ए. मांजरे, ग्राम महसूल अधिकारी आर. के. पुजारी आणि आर. व्ही. गायकवाड यांनी संयुक्तपणे कारवाई केली.
कारवाईदरम्यान १० लाख रुपये किमतीचा जेसीबी (एमएच २५ सी ५१६७), १२ लाख रुपये किमतीचा टाटा हायवा (एमएच १३ डीक्यू ८२९४) आणि अंदाजे ३ हजार ६०० रुपये किमतीचा ६ ब्रास मुरुम असा एकूण २२ लाख ३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी जेसीबी चालक गणेश बसागरे, हायवा चालक लक्ष्मण काळे आणि वाहन मालक सत्यवान पाटील यांनी संगनमत करुन शासनाच्या मालकीचा मुरुम विनापरवाना व विना रॉयल्टी काढल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याप्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५), महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम ४८(७), ४८(८), पर्यावरण संरक्षण कायदा कलम ९ व १५ तसेच सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियमातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
Post Views: 51
Previous Post

ज्येष्ठ साहित्यिका सुमन चंद्रशेखर यांची तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कारांची हॅटट्रिक!

Next Post

मुंढे साहेब, माढा-टेंभुर्णीकडेही लक्ष द्या! भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या विक्रीबाबत नागरिकांमध्ये चिंता

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
मुंढे साहेब, माढा-टेंभुर्णीकडेही लक्ष द्या! भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या विक्रीबाबत नागरिकांमध्ये चिंता

मुंढे साहेब, माढा-टेंभुर्णीकडेही लक्ष द्या! भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या विक्रीबाबत नागरिकांमध्ये चिंता

ताज्या बातम्या

कंदलगाव, गुंजेगावात महिनाभर पाणी, मग मंद्रूपचे शेतकरी पाण्यापासून वंचित का ?

September 14, 2026
देशाला दिशा देण्याचे काम आटपाडी तालुक्यातील ज्येष्टांनी करावे

देशाला दिशा देण्याचे काम आटपाडी तालुक्यातील ज्येष्टांनी करावे

September 14, 2026
कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयामध्ये श्री गणेश प्रतिष्ठापना व मिरवणूक उत्साहात

कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयामध्ये श्री गणेश प्रतिष्ठापना व मिरवणूक उत्साहात

September 14, 2026
सलग 25 व्या वर्षी इंडियन मॉडेल स्कूलमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत….!

सलग 25 व्या वर्षी इंडियन मॉडेल स्कूलमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत….!

September 14, 2026

आजोबा गणपतीचे थाटात झाले पूजन ….#viral #solapurnews #aajsolapur #latestnews #maazsolapur

September 14, 2026

अज्ञात कारणावरुन कोरफळे येथे महिलेची आत्महत्या

September 14, 2026

अलीपूर येथून २६ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता

September 14, 2026

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीचे शोषण

September 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1208852

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!