सांगोला – आपुलकी मित्र मंडळ, कडलास यांच्या तर्फे सांगोला तालुक्यातील २७ जि.प.शाळेच्या केंद्रातील इ.४ थी मधील स्कॉलरशिप परीक्षेत प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सां.ता.उ.शि.मंडळाचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड, शिवसेनेचे सागर पाटील, डॉ.पियुषदादा साळुंखे पाटील, गटशिक्षणाधिकारी युवराज निलख, विस्तार अधिकारी अमोल भंडारी, कडलासच्या सरपंच सुनिता भजनावळे, माजी उपसरपंच सुनिल पाटील, समाधान पवार, शंकर लवटे, प्रशांत तेली, प्रशांत साळुंखे यांच्या शुभहस्ते ट्रॉफी, प्रशस्तिपत्र, रोख रक्कम व गुलाब पुष्प देऊन करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष प्रा.डाॅ.बबन गायकवाड, उपाध्यक्ष विश्वनाथ शिंदे, सचिव शहाजी पाटील, सहसचिव विलास इंगळे, खजिनदार इंजि.केशव लिगाडे, सदस्य जगन्नाथ गायकवाड, पोपट जाधव, वैशाली देशपांडे, विलास अनुसे, आनंदराव गायकवाड, सुभाष गायकवाड उपस्थित होते.
प्रास्ताविकात केशव लिगाडे यांनी संस्थेने राबविलेल्या शैक्षणिक, सामाजिक उपक्रमाची माहीती दिली. यावेळी मनोगतात बाबुराव गायकवाड यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून आयुष्यात यशस्वी होण्याचा कानमंत्र दिला. तसेच त्यांनी आपुलकी मित्र मंडळ, कडलास या संस्थेचे कौतुक केले. डाॅ.पियुषदादा साळुंखे पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सुनील पाटील, युवराज निलख, जि.प.शाळा, करलवस्ती, कडलासची विद्यार्थीनी स्वानंदी शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांना भावी शिक्षणासाठी शुभेच्छा देत डाॅ.प्रा.बबन गायकवाड यांनी आभार मानले.
Post Views: 6