कुर्डूवाडी – येथील आदर्श सैनिकी स्कूलला आज, दिनांक 21 ऑगस्ट रोजी, राज्यस्तरीय अंदाजपत्रकीय विधिमंडळ समितीने सदिच्छा भेट पाहणी केली .
यावेळी समितीचे सदस्य, माजी मंत्री तथा रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय आमदार सदाभाऊ खोत, तसेच आमदार किशोर (आप्पा) पाटील, आमदार मंदाताई म्हात्रे आणि आमदार मनीषाताई चौधरी प्रांत जयश्री आव्हाड, तहसीलदार संजय भोसले , बीडीओ महेश सुळे मुख्याधिकारी सचिन तपसे, स्नेहा कंठे, गटशिक्षणअधिकारी श्रीधर भोसले विस्ताराधिकारी विकास यादव .तसेच सर्व विभागातील अधिकारीवर्ग उपस्थित होते. यावेळी समिती सदस्यांनी आदर्श सैनिकी स्कूलच्या परिसराची पाहणी केली.
मान्यवरांनी शाळेतील शैक्षणिक सुविधा, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध सोयी-सुविधा, सैनिकी प्रशिक्षण तसेच शाळेच्या भव्य पायाभूत सुविधांची पाहणी करून संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी संस्थेच्या वतीने सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक स्वागत व सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेकडून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचे समिती सदस्यांनी विशेष कौतुक केले.
Post Views: 9