सांगोला – सोमवार दि.६ एप्रिल पासून सुरू झालेल्या आटपाडी-गाणगापूर एसटी बसचे नाझरे (ता.सांगोला) येथे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी बसचे ड्रायव्हर नितीन सरोदे, कंडक्टर दादासाहेब नरळे व प्रवासी संघटनेचे सदस्य शंकर बंडगर यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी डॉ.विजय सरगर, अशोक पाटील, नंदकुमार रायचुरे, अमर रायचुरे, बाबुराव जोंधळे, लक्ष्मण ढोबळे, बंडू माने, दत्तात्रय जावीर, बबन भडंगे, संतोष निंबाळकर, रविराज शेटे, सुनील जवंजाळ उपस्थित होते. आटपाडी ते नाझरे मार्गे गाणगापूर ही एसटी बस प्रवासी सेवा संघाच्या माध्यमातून सुरू झाल्याने भाविक भक्त मंडळीत समाधानाचे वातावरण पसरले असून या बसनेच प्रवास करा असे मनोगत शंकर बंडगर व रविराज शेटे यांनी यावेळी व्यक्त केले.
तसेच बलवडी पाटी येथे शिवाजी शिंदे, कृष्णदेव कारंडे, रेवन बदडे, धनाजी पांढरे, राजेंद्र इकारे यांनीही बसचे ड्रायव्हर, कंडक्टर यांचा सत्कार केला.

















