वळसंग – तालुका दक्षिण सोलापूर येथील कु. हर्ष वीरेश बागलकोटी यांनी IELTs परीक्षा पास होऊन मास्टर डिग्री साठी जर्मनी येथे निवड झाल्या आहे. प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद मराठी शाळेत,उच्च माध्यमिक शिक्षण श्री शंकरलिंग प्रशालेत तर बी टेक इन रोबोटिक्स अँड ऑटोमेशन पुणे येथे पूर्ण केले आहे.
श्री शंकरलिंग प्रशालेचे माजी मुख्याध्यापक संगमेश्वर बागलकोटी यांचे नातू आहे. याच संस्थेत आई शिक्षिका तर वडील दानेश्वरी मेडिकल स्टोअर्स व्यवसाय करतात.
परदेशीय शिक्षणासाठी जर्मनी साठी निवड झाल्याबद्दल वळसंग शिवारात हर्ष बागलकोटी याचे कौतुक आणि अभिनंदन व्यक्त होत आहे.


























