Friday, September 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

श्री 1008 भगवान महावीर यांचा 2625 वा जन्मकल्याणक महोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

तरुण भारतbyतरुण भारत
March 31, 2026
in editor
0
श्री 1008 भगवान महावीर यांचा 2625 वा जन्मकल्याणक महोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – दिनांक 30 मार्च 2026 सोमवार, सोलापूर येथील श्राविका संकुलात अहिंसेचे महान उपासक, जगाला शांतीचा संदेश देणारे,जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर श्री 1008 भगवान  महावीर यांचा 2625 वा जन्मकल्याणक महोत्सव भक्तिमय वातावरणात, मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 

यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमाबाई श्राविका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुकुमार मोहोळे तर प्रमुख अतिथी म्हणून प्रशालेच्या वरिष्ठ दीप्ती शहा, चतुरबाई प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका राखी देशमाने, उमाबाई श्राविका विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित, पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ यांची उपस्थिती होती. 

कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री 1008 भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून पुष्पांजली अर्पण करण्यात आली. यानंतर प्रशालेच्या वरिष्ठ दीप्ती शहा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उमाबाई श्राविका विद्यालयातील सहशिक्षिका पल्लवी खांडवे व सोनाली उंडे यांनी आपल्या सुमधुर आवाजात जैन ध्वजगीताचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी याप्रसंगी *जिओ और जीने दो*,*अहिंसा परमो धर्म की जय*,*श्री1008 महावीर भगवान की जय* या  घोषणांनी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण केले. *चतुरबाई विद्यालयातील सहशिक्षिका प्रगती गांधी यांनी यावेळी भगवान महावीर यांच्या जीवन चरित्राचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला. तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या जगाला भगवान महावीरांच्या विचारांची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच भगवान महावीरांनी सांगितलेली *सत्य,अहिंसा,अस्तेय अपरिग्रह व ब्रह्मचर्य ही पंचतत्वे समजून घेऊन प्रत्येकाने जीवनात आचरणात आणण्याची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. जैन धर्मीय अनेकांतवाद, स्याद्वाद म्हणजे काय? हे विद्यार्थ्यांना त्यांनी अगदी सहज सोप्या,अमोघ वाणीने उलगडून दाखवले.* 

 तत्पूर्वी शाळा परिसरातील श्री 1008 भगवान महावीर मंदिरात सकाळी आठ वाजता भगवंतांचा पंचामृत अभिषेक सानंद संपन्न झाला. तदनंतर पाळणा सोहळ्यात महिला श्राविका मोठ्या संख्येने सहभागी होऊन भक्तीरसात न्हाऊन निघाल्या.  

  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक वृषभ सोनटक्के तर आभार सुहास सुहास छंचुरे यांनी केले. यावेळी उमाबाई श्राविका विद्यालय व चतुरबाई श्राविका विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशालेतील सर्व शिक्षक यांनी पांढरा पोशाख परिधान केला होता तर प्रशालेतील कलाशिक्षक प्रविण कंदले यांनी भगवान महावीरांचे काढलेले चित्र सर्वांचे आकर्षण ठरले

Post Views: 55
Previous Post

चैत्र एकादशी निमित्त “भक्ती सत्संग भजन” सोहळा

Next Post

डब्ल्यू.आय.टी. जैन मंदिरात  भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव भक्तिभावात

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
डब्ल्यू.आय.टी. जैन मंदिरात  भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव भक्तिभावात

डब्ल्यू.आय.टी. जैन मंदिरात  भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव भक्तिभावात

ताज्या बातम्या

पांडुरंगचा ‘ क्रिडा महोत्सव एकात्मतेचे प्रतिक – डॉ . यशवंत कुलकर्णी 

September 4, 2026

भारत-सेशेल्स संबंध अधिक दृढ करण्यावर भर – विधानसभा अध्यक्ष  ॲड. राहुल नार्वेकर

September 4, 2026

बजाज फिनसर्व्हच्या अत्याधुनिक मुख्यालयामुळे पुण्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 4, 2026

शहर सुधारित पाणीपुरवठा प्रकल्पाला राज्य शासनाची मंजुरी

September 4, 2026

झरेगावातील शेतकऱ्यांच्या एकजुटी पुढे महावितरण नमले 

September 4, 2026

आईने तीन मुलांसह मारली किल्ल्यावरून उडी #viral #news

September 4, 2026

महाप्रसाद भंडारा लंगर इफ्तार पार्टी लग्नाच्या पंगतील आहे आता एफडीए ची परवानगी हवी #marathinews #news

September 4, 2026

दारूचे दुकान बंद करा म्हणत पुढे आल्या महिला #solapurnews #viral

September 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1162483

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!