सोलापूर : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने अस्थिविहार (प्रेरणाभूमी) येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या प्रसंगी महामंडळाचे विश्वस्त बाबा बाबरे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलसास पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थितांनी बाबासाहेबांच्या विचारांना उजाळा देत त्यांच्या कार्याची आठवण जागवली.
यावेळी महामंडळाचे विश्वस्त अध्यक्ष आनंद चंदनशिवे, सचिव रॉकी बंगाळे, उत्सव अध्यक्ष नागेश इंगळे, माजी नगरसेवक गणेश पुजारी, अशितोष नाटकर, श्रीमंत जाधव, बाबा कसबे, मनोज पेदोलू आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान समस्त महार वतनदार पंच ट्रस्टचे विश्वस्त बी. के. तळभंडारे यांनी रॉकी बंगाळे यांना “डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सोलापूरचे ऋणानुबंध” हे पुस्तक भेट देऊन सन्मानित केले.


















