येथिल कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा ३६ वा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांचे हस्ते संप्पन्न झाला .
यावेळी व्हा .चेअरमन कैलास खुळे , जेष्ठ संचालक दिनकरभाऊ मोरे , दिलीपराव चव्हाण , उमेश परिचारक, ज्ञानदेव ढोबळे , तानाजी वाघमोडे , बाळासाहेब यलमार , लक्ष्मण धनावडे , भास्कर कसगावडे , भैरु वाघमारे , गंगाधर विभूते , सुदाम मोरे , विजय जाधव , हणमंत कदम , किसन सुरवसे, सिताराम शिन्दे , राणू पाटील, दाजी भुसनर, दिलिपराव गुरव , कार्यकारी संचालक डॉ . यशवंत कुलकर्णी उपस्थित होते .
प्रथम शामराव रामा साळुंखे व पत्नी संचालिका संगिता शामराव साळुंखे यांचे हस्ते सत्यनारायणाची पुजा करण्यात आली .
यानंतर विधिवत बॉयलर अग्नी प्रदीपन करण्यात आले .
यावेळी प्रशांतराव परिचारक यांनी यावेळच्या गळीत हंगामावर दुष्काळाचे सावट असल्याने ऊसाचे उत्पादन घटून अपेक्षित गाळपासाठी कसरत करावी लागणार असल्याचे सांगितले .
तर कार्यकारी संचालक डॉ . यशवंत कुलकर्णी यांनी आमची ऊस गाळपा साठीची तयारी पूर्ण झाली असून आवश्यक असणारी ऊस तोडणी यंगणा सज्ज असून या वेळी ९ लाख टन ऊस गाळप करणेत येणार असल्याचे सांगितले .
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
























