Monday, September 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पंढरपूर अर्बन बँकेतील ३ कोटींच्या ‘एटीएम फ्रॉड’ प्रकरणात दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता

तरुण भारतbyतरुण भारत
August 16, 2026
in solapur
0
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
​पंढरपूर – एटीएम मशीनच्या सेन्सरशी छेडछाड करून ‘एरर ९०२’ जनरेट करायचा आणि बँकेकडून लाखो रुपयांचा अपहार करायचा, या गाजलेल्या ३ कोटी रुपयांच्या सायबर फ्रॉड प्रकरणात पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपातून उत्तर प्रदेशातील दोन्ही आरोपींची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के. आर. मोरे यांनी ससन्मान निर्दोष मुक्तता केली आहे.
​बँकेचे तात्कालीन व्यवस्थापक राजेश औदुंबर आगवणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार: १५ मार्च २०२३ ते १९ मे २०२३ दरम्यान हा संपूर्ण प्रकार घडला होता. पंढरपूर अर्बन बँकेच्या मुख्य कार्यालयासह विविध जिल्ह्यांतील २२ एटीएम केंद्रांमधून ३,०५९ संशयास्पद व्यवहार झाले. आरोपी वेगवेगळ्या २६ बँकांचे तब्बल ६६८ एटीएम कार्ड वापरून पैसे काढत असत.  पैसे बाहेर पडताना एटीएमच्या कॅश डोअर आणि सेन्सरला हाताच्या बोटांनी अडथळा निर्माण केला जायचा. यामुळे मशीनमध्ये ‘एरर ९०२’ असा मेसेज जनरेट व्हायचा. मशीनमधून रोख रक्कम हातात मिळूनही, पैसे मिळाले नाहीत, अशी खोटी तक्रार बँक आणि कस्टमर केअरकडे केली जायची. बँक ही रक्कम रिफंड म्हणून ग्राहकाच्या खात्यात पुन्हा जमा करायची. अशा प्रकारे बँकेची ३ कोटी ३ हजार २०० रुपयांची फसवणूक झाल्याचा दावा करत ७ जून २०२३ रोजी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी उत्तर प्रदेशातून निरज नथुराम निषाद (वय २१, रा. कालपी, जि. जालोन) आणि आनंद कुमार रामसिंग (वय ३०, रा. भोगनीपूर, जि. कानपूर देहात) या दोघांना जुलै २०२३ मध्ये अटक केली होती.
​सुनावणीदरम्यान आरोपी क्रमांक १ तर्फे ॲड. समाधान महामुनकर आणि आरोपी क्रमांक २ तर्फे ॲड. विनायक सरवळे यांनी पोलिसांच्या तपासातील आणि बँकेच्या दाव्यातील गंभीर त्रुटी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यावर न्यायाधीशांनी खालीलप्रमाणे ताशेरे ओढले. ​फिर्यादी किंवा बँकेचा कोणताही साक्षीदार आरोपींना एटीएम मशीन अथवा सेन्सरशी छेडछाड करताना प्रत्यक्ष पाहिलेला नाही. सर्व साक्षीदारांचे जबाब हे ‘ऐकीव माहितीवर’ आधारित होते. बँकेने दावा केला होता की आरोपींनी ६६८ एटीएम कार्ड्सचा वापर केला. मात्र, तपासी अधिकाऱ्यांनी या ६६८ कार्डधारकांपैकी एकाही मूळ ग्राहकाचा अथवा इतर बँकांचा जबाब नोंदवला नाही. कार्ड हरवल्याची किंवा चोरीला गेल्याची एकही फिर्याद ऑन रेकॉर्ड आलेली नाही. पोलिसांनी सादर केलेले फोटो आणि सीसीटीव्ही फुटेज आरोपींचे असले, तरी त्या फोटोंमध्ये आरोपी एटीएम सेन्सरशी छेडछाड करताना किंवा बेकायदेशीर कृत्य करताना दिसत नाहीत. सायबर गुन्ह्यात डिजिटल पुरावा सिद्ध करण्यासाठी आवश्यक असणारी ‘हॅश व्हॅल्यू’ पडताळणी करण्यात आली नव्हती. बँकेची तपासणी करणाऱ्या एनसीआर कंपनीच्या सर्व्हिस इंजिनिअरची उलटतपासणी घेतली असता, त्याने संगणक किंवा इलेक्ट्रॉनिक्स शाखेची कोणतीही पदवी घेतली नसल्याचे व तो आर्ट्स पदवीधर असल्याचे न्यायालयात समोर आले.
​दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि सर्वोच्च न्यायालयाचे विविध न्यायनिवाडे विचारात घेऊन न्यायाधीश के. आर. मोरे यांनी स्पष्ट केले की, केवळ नैतिक संशयाच्या आधारावर कोणालाही दोषी ठरवता येत नाही. सरकारी पक्ष आरोपींविरुद्धचा गुन्हा संशयापलीकडे सिद्ध करण्यात पूर्णपणे अपयशी ठरला आहे. त्यामुळे संशयाचा फायदा आरोपींना मिळणे कायद्यानुसार रास्त ठरते. आरोपी इतर कोणत्याही गुन्ह्यात वर्ग नसतील तर त्यांची मध्यवर्ती कारागृहातून तात्काळ सुटका करण्याचे आदेशही न्यायाधीशांनी दिले आहेत.
—
चौकट :
​
जप्तीचा अभाव, संशयास्पद विलंब
​आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्या ताब्यातून एकही बनावट अथवा मूळ डेबिट कार्ड जप्त करण्यात पोलिसांना यश आले नाही. तसेच अपहारातील एक रुपयाची रक्कमही आरोपींकडून रिकव्हर झालेली नाही. मार्च ते मे २०२३ या तब्बल दोन महिन्यांच्या काळात ३ कोटींचा अपहार होत असताना बँकेच्या संगणक प्रणाली किंवा ऑडिट यंत्रणेच्या हे लक्षात का आले नाही? आणि पोलिसांत फिर्याद देण्यास उशीर का झाला? याचे कोणतेही ठोस कारण सरकारी पक्षाला देता आले नसल्याचे आरोपींचे वकील ॲड. विनायक सरवळे आणि  ॲड. समाधान महामुनकर यांनी निदर्शनास आणून दिले.
Post Views: 64
Previous Post

ओंकार साखर कारखान्यावर प्रशांतराव बोञे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण

Next Post

उमाबाई श्राविका विद्यालयाचे क्रीडा शिक्षक सुहास छंचुरे यांना दुधारे स्पोर्टस् फाऊंडेशनचा राष्ट्रीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
उमाबाई श्राविका विद्यालयाचे क्रीडा शिक्षक सुहास छंचुरे यांना दुधारे स्पोर्टस् फाऊंडेशनचा राष्ट्रीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार

उमाबाई श्राविका विद्यालयाचे क्रीडा शिक्षक सुहास छंचुरे यांना दुधारे स्पोर्टस् फाऊंडेशनचा राष्ट्रीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार

ताज्या बातम्या

पाणी सोडणे का शक्य नाही काय म्हणाले पहा पालकमंत्री #solapurnews

September 21, 2026

टँकरची व्यवस्था करताना कोणी दिरंगाई केली तर कारवाई करू गोरे #solapurnews

September 21, 2026

बाळाचा उपचारादरम्यान झाला मृत्यू नातेवाईकांनी डॉक्टर व रुग्णालय प्रशासनावर केला आरोप

September 21, 2026

जड वाहतूक रोखा म्हणत गोदुताई परुळेकर वसाहतीच्या नागरिकांचा रास्ता रोको आंदोलन

September 21, 2026
श्री नवनाथ गावडे यांच्या घरी गौरीची आकर्षक सजावट

श्री नवनाथ गावडे यांच्या घरी गौरीची आकर्षक सजावट

September 21, 2026
वळसंग ग्राम समृध्दी पुस्तकीचे मान्यवरांचा हस्ते प्रकाशन 

वळसंग ग्राम समृध्दी पुस्तकीचे मान्यवरांचा हस्ते प्रकाशन 

September 21, 2026
शंकरलिंग प्रशालेत गणेशोत्सव निमित्त व्याख्यानमाला संपन्न

शंकरलिंग प्रशालेत गणेशोत्सव निमित्त व्याख्यानमाला संपन्न

September 21, 2026
पक्षी, झाडे आणि आकाशातील बदलांतून हवामानाचा अंदाज शक्य

पक्षी, झाडे आणि आकाशातील बदलांतून हवामानाचा अंदाज शक्य

September 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1241947

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!