
श्रीपूर – येथिल कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कंत्राटी सुरक्षारक्षक कृष्णदेव हनुमंत लोखंडे रा .भंडीशेगाव हे गेल्या तीन महिन्यांपूर्वी आपली ड्युटी संपवून गावाकडे जात असताना कोळ्याच्या मळ्या जवळ एक चार चाकी वहानाने त्यांना धडक दिली त्यात ते गंभीर जखमी झाले . दवखन्यात दाखल केल्या नंतर गंभीर ईजा झाल्याने तीन महिने दवाखान्यात त्यांचेवर उपचार सुरू होते . उपचारा नंतर बरे होऊन घरी आले . परंतू डोक्यावर मार लागल्याने डॉक्टरनी अधिक काळजी घेण्यास सांगितले . दरम्यान दवाखन्या त्यांचा मोठा खर्च झाला त्यात ते कंत्राटी असल्याने व आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यकारी संचालक डॉ . यशवंतराव कुलकर्णी यांचे कडून जावून कामगारांकडून आर्थिक मदत गोळा करणेची परवानगी मागितली . डॉ . कुलकर्णी यांनी घटनेचे गांभीर्य व कामगाराची आपुलीकी पाहून यास तात्काळ परवानगी दिली . यानंतर सुरक्षा विभाग प्रमुख महादेव सलगर , जमादार विक्रम काळेल , देवा खटके , अरविंद लोंढे , दत्तात्रय सकट यांनी सर्व कामगारांकडून वर्गणी गोळा केली व एक्काहत्तर रु . चा धनादेश कृष्णदेव लोखंडे यांच्याकडे सुपूर्द केला . आपल्या सहकाऱ्यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून दाखवलेल्या या औदार्याने नकळत लोखंडे यांचे डोळे पाणवले .
Post Views: 4