सोलापूर – भर वेगात व बेदरकारपणे दुचाकी चालवून , अपघात करून मित्राच्या मृत्यूला कारणीभूत झाल्या प्रकरणी दुचाकी स्वार मित्रावर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करण शाम भणगे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून याबाबत अपघातात मयत झालेल्या तरुणाची पत्नी प्रिया विशाल जाधव (रा. ११२, सनत नगर, लिमयेवाडी, सोलापूर ) यांनी फिर्याद दिली आहे .
यातील फिर्यादीचे पती विशाल व त्यांचा मित्र यातील आरोपी करण भणग हे दि. १ जून २०२६ रोजी पहाटे २.३० वा चे सुमारास सैफुल येथून जेवण करुन आरोपीची दुचाकी (क्रं. एम एच १३ डी एन ९०१४ )वरुन घरी येत होते .दुचाकी आरोपी चालवत होता .आणि सदर दुचाकी सैफुल येथील शगुप्ता दालचावल जवळ ताबा सुटल्याने दुचाकी घसरून रस्त्यावर पडली. त्यात फिर्यादीच्या पतीचा गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यु झाला . पतीच्या मरणास यातील आरोपी कारणीभुत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे . पोलीस हवालदार जाधव हे गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहे .
Post Views: 22