सोलापूर – नणंदेच्या पती च्या व्यवसायासाठी माहेरून ३ लाख रुपये आण म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सहा जणांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
चनबसप्पा- पती, सुरेखा-सासु, अल्लप्रभु दिर, कावेरी- जाऊ, जयश्री- नणंद, रामसागर – नणंदेचा पती (सर्व रा. जी ५२, आदर्श नगर, विजापूर , कर्नाटक ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून याबाबत प्राजक्ता चनबसप्पा चनगोंड ( रा. २६, मुक्ती नगर, सैफल, सोलापूर ) यांनी फिर्याद दिली आहे .
यातील फिर्यादी ३० मे २०२१ रोजी ते आजतागायत सासरी नांदत असताना वरील आरोपींनी मिळुन फिर्यादीस शारीरीक व मानसिक त्रास देवून मारहाण केली व नंदोइला खाजगी व्यवसाय सुरु करण्यासाठी माहेरुन ३ लाख रुपये घेवून ये म्हणून मानसिक छळ केला आहे. तसेच फिर्यादीला माहेरी निघुन जा असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे . सहाय्यक फौजदार पवार हे गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत .
Post Views: 25