माळशिरस – पंचायत समितिच्या सभापती पदाची संधी निमगाव गावाला प्रथम मिळाली या बद्दल रणजितसिंह सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने नुतन सभापती दत्ता मगर यांचा सन्मान करण्यात आला.
या वेळी बोलताना दत्ता मगर म्हणाले की रणजितसिंह सार्वजनिक वाचनालयानाच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण भागात वाचन संस्कृती रूजविली मोबाईलच्या जमान्यात आजही वाचनालयात वाचक पुस्तकांचे व दैनिकाचे वाचन करतात ही आभिमानस्पद बाब आहे भविष्यात वाचनालयाच्या सामाजीक आर्थिक कामाला पुर्णपणे सहकार्य करणार आशी ग्वाही मगर यांनी दिली
या वेळी रामभाऊ मगर ,प्रतापराव मगर ,शांतिलाल काटकर ,संजय मगर ,राज मगर, प्रशांत कस्तुरे, चांगदेव साठे यासह बहुसंख्य वाचक उपस्थित होते

















