Monday, May 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

नागरिकांनी गॅस एजन्सी समोर ई केवायसी व बुकिंग ची माहिती घेण्यासाठी रांगा लावू नयेत

तरुण भारतbyतरुण भारत
April 2, 2026
in editor
0
नागरिकांनी गॅस एजन्सी समोर ई केवायसी व बुकिंग ची माहिती घेण्यासाठी रांगा लावू नयेत
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – शहरात बीपीसीएल, आयओसीएल व एचपीसीएल या तीन गॅस कंपनीच्या  एकूण २० गॅस एजन्सी कार्यरत आहेत. यातील सात गॅस एजन्सी समोर नागरिक ई केवायसी साठी तसेच गॅस सिलेंडर साठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असल्याचे निर्देशनास आले आहे. तरी नागरिकांनी घरी बसून क्यू आर कोडच्या माध्यमातून ई केवायसी  करावे व तर गॅस कंपन्यांनी गर्दी होणाऱ्या गॅस एजन्सींना वाढीव गॅस सिलेंडर पुरवठा करून त्या एजन्सीनी गॅस सिलेंडरचा पुरवठा घरपोच करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.


     नियोजन भवन येथील सभागृहात गॅस पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या तसेच गर्दी होणारा शहरातील सात गॅस एजन्सी प्रतिनिधी यांच्या समवेत आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे, गॅस कंपनीचे जिल्हा समन्वयक श्री. रघुकुमार, एचपीसीएलचे सागर चव्हाण व आयओसीएलचे सागर गौतम यांच्यासह गॅस एजन्सी चे प्रतिनिधी उपस्थित होते.  


    जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले की, जिल्ह्यातील गॅस एजन्सी समोर गर्दी होऊ नये यासाठी प्रशासनाने २३ मार्च रोजी स्पष्ट आदेश दिले आहेत. तरी सोलापूर शहरातील काही ठिकाणी गॅस एजन्सी समोर सिलेंडर साठी रांगा लागत आहेत. तसेच एजन्सीच्या म्हणण्याप्रमाणे ई केवायसी साठी नागरिक मोठ्या प्रमाणावर येत असल्याने ई केवायसी साठी प्रशासनाच्या वतीने क्यूआर कोड उपलब्ध करून देण्यात येत आहे. नागरिकांनी घरी बसूनच ऑनलाइन ई-केवायसी करण्याचे आवाहन त्यांनी केले.


    सोलापूर जिल्ह्याच्या एलपीजी गॅस पुरवठा मध्ये बदल झालेला नाही, परंतु पॅनिक बुकिंग मुळे गॅस सिलेंडरच्या मागणीत अडीच पट वाढ झालेली आहे. त्यामुळे सिलेंडरचा पुरवठा करण्यात वेळ लागत आहे. पॅनिक बुकिंग कमी झाल्यानंतर लोकांना गॅस सिलेंडर वेळेत मिळणार आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवावर विश्वास ठेवू नये. व गरज नसताना बुकिंग करू नये. सोलापूर जिल्ह्यासाठी पेट्रोल, डिझेल व एलपीजी चा मागणीप्रमाणे साठा उपलब्ध होत आहे. गॅस एजन्सी समोर सिलेंडर साठी येऊ नये, ऑनलाइन बुकिंग करावे व घरपोच सिलिंडर उपलब्ध करून घ्यावा. ज्या गॅस एजन्सी ना गॅस सिलेंडरचा अतिरिक्त साठा आवश्यक असेल त्यांनी तशी मागणी नोंदवावी व मिळालेला साठा हात ऑनलाइन बुकिंग केलेल्या ग्राहकांनाच घरपोच पोहोचवण्याचे योग्य नियोजन करावे. त्यासाठी अतिरिक्त वाहने व डिलिव्हरी बॉय उपलब्ध करून घ्यावेत, असेही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी निर्देशित केले.
   गॅस एजन्सीमध्ये ई केवायसी करण्यासाठी तसेच  बुकिंग ची माहिती विचारण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून ग्राहकांसाठी तक्रार निवारण केंद्र उभारले जात असून यासाठी पुरवठा विभागाचे तीन कर्मचारी तसेच एचपीसीएल बीपीसीएल व आयओसीएल या कंपनीचा एक एक प्रतिनिधी नियुक्त करण्यात येत आहे. या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे गॅस सिलेंडरच्या अनुषंगाने आलेल्या तक्रारी विषयी त्यांचे निवारण करून समाधान करणे अपेक्षित असल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.
    गॅस कंपनीचे जिल्हा समन्वयक श्री. रघुकुमार यांनी तिन्ही कंपन्यांच्या वतीने गॅस सिलेंडरची वाढीव मागणी असलेल्या गॅस एजन्सींना पुरवठा करण्यात येईल असे सांगितले. तसेच ग्राहक तक्रार निवारण केंद्रासाठी एक एक कर्मचारी उपलब्ध करून देण्यात येईल असेही त्यांनी म्हटले.
    प्रारंभी अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी सोलापूर शहरातील गॅस एजन्सी ची माहिती देऊन यातील सात गॅस एजन्सी समोर नागरिक मोठ्या प्रमाणावर रांगा लावत असल्याचे सांगितले.

——–

सोलापूर शहरातील LPG ग्राहकांचे ekyc करणे प्रक्रिया व घरपोच सिलेंडर पुरवठा करण्याबाबत सूचना

*आपण सोलापूर शहरातील अधिकृत एलपीजी ग्राहक आहात

*कृपया आपले गॅस कनेक्शन सुरू ठेवण्यासाठी ekyc करण्याबाबत आपण संबंधित gas एजन्सी मध्ये न जाता मोबाईल द्वारे ekyc ची प्रक्रिया पूर्ण करता येईल. त्यासाठीचा क्यूआर कोड प्रशासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येत आहे.

*सर्वप्रथम आपण खालीलप्रमाणे ऍप play स्टोर मधून डाउनलोड करावे

 १.IOCL कंपनीचे जी ग्राहक असल्यास Indane Oil ONE हे ऍप डाउनलोड करावे
२.BPCL कंपनीचे ग्राहक असल्यास BPCL For Business हे ऍप download करावे
३.HPCL कंपनीचे ग्राहक असल्यास HP PAY हे ऍप download करावे.

वरील ऍप मध्ये माहिती भरून
Adhaar Face RD या appvarun प्रमाणित करून आपले ekyc त्वरित पूर्ण करून घ्यावे.
तसेच आपली गॅस बुकिंग झाली असल्यास आपल्याला विहित वेळेत घरपोच गॅस सिलेंडर पुरवठा होणार असल्यामुळे कृपया गॅस एजन्सी समोर रांगेत उभे राहू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासन यांच्याकडून करण्यात येत आहे.

Post Views: 131
Previous Post

श्री पंचमुखी हनुमान देवस्थानम् येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त सोहळा

Next Post

चिखलठाणच्या कोटलींग देवाच्या यात्रेला सुरुवात

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
चिखलठाणच्या कोटलींग देवाच्या यात्रेला सुरुवात

चिखलठाणच्या कोटलींग देवाच्या यात्रेला सुरुवात

ताज्या बातम्या

पालकांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधावा – प्रशांत माने

May 25, 2026

हम कमिशनर है म्हणणाऱ्या रीलवाल्याचा पोलिसांनी उतरवला माज

May 24, 2026

आरक्षणावर सडेतोड बोलले ओबीसी नेते हाके

May 24, 2026

नाभिक समाजाच्या पुढाकारातून दोन गरीब दाम्पत्याच्या जुळल्या रेशीमगाठी

May 23, 2026

निकाळजेंच्या घरी सांत्वनासाठी पोहोचल्या खा प्रणिती शिंदे

May 23, 2026

श्री शक्ती सेवा समिती सोलापूरच्या वतीने ऐश्वर्या लक्ष्मी सुवर्ण कुबेर महोत्सवात सुवासिनींने केले पूज

May 23, 2026

काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे यांचे निधन

May 23, 2026

अप्रिय घटना नको, त्वरित पोलिसांना संपर्क साधा ईदसाठी सूचना

May 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0877726

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697