सांगोला – शहराच्या पश्चिम भागात सुशोभीकरणासह नागरी सुविधांमध्ये भर घालण्याच्या उद्देशाने सांगोला नगरपालिकेमार्फत मिरज रोड ते वंदे मातरम चौक बायपास या महत्त्वाच्या मार्गावर उच्च दर्जाच्या डेकोरेटिव्ह लाईट बसविण्याच्या कामासाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला असून हे काम माजी आ.शहाजीबापू पाटील यांच्या माध्यमातून मार्गी लागले असल्याची माहिती नगराध्यक्ष आनंद माने यांनी दिली. या प्रकाश व्यवस्थेमुळे शहराच्या मुख्य पश्चिम भागाचे माळवाडी मार्गाचे सौंदर्य वाढण्यासोबतच नागरिकांना रात्रीच्या वेळी अधिक सुरक्षित, प्रकाशमान आणि सुखकर प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. या कामासाठी माजी
आ.शहाजीबापू पाटील व नगराध्यक्ष आनंद माने यांच्याकडे नगरसेवक चैतन्य राऊत, नगरसेविका सीमाताई सरगर यांनी सतत पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नातून हा विकास प्रकल्प प्रत्यक्षात येत आहे.
चौकट-
या उपक्रमामुळे शहराचे सौंदर्य वाढण्याबरोबरच पश्चिम भागातील नागरी विकासाला गती मिळेल आणि सांगोल्याच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भर पडेल, अशी अपेक्षा नगरसेवक चैतन्य राऊत व नगरसेविका सीमाताई सरगर यांनी व्यक्त केली.