Saturday, June 20, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

देवस्थानांच्या भूमी संरक्षणासाठी ‘अँटी लँड ग्रॅबिंग’ कायदा करण्याची मागणी

तरुण भारतbyतरुण भारत
June 20, 2026
in west maharashtra
0
देवस्थानांच्या भूमी संरक्षणासाठी ‘अँटी लँड ग्रॅबिंग’ कायदा करण्याची मागणी
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर / तुळजापूर : महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावित ‘महाराष्ट्र इनाम निर्मूलन अधिनियम २०२६‘ या कायद्याला सध्या स्थगिती देण्यात आली असली, तरी हिंदूंच्या प्राचीन देवस्थानांच्या, मठांच्या आणि मंदिरांच्या जमिनींच्या संरक्षणासाठी शासनाने स्वतंत्र ‘सनातन बोर्ड’ स्थापन करावे, अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने आयोजित तुळजापूर व सोलापूर येथील बैठकींमध्ये करण्यात आली. या बैठकीस तुळजापूर येथे भोपी पुजारी मंडळ, पाळेकर पुजारी मंडळ, उपाध्याय पुजारी मंडळ तसेच सेवेकरी प्रतिनिधींसह ६० हून अधिक मंदिर विश्वस्त, पुजारी व धर्मप्रेमी सहभागी झाले होते. तर सोलापूर येथे सोलापूर शहर, बार्शी, मोहोळ आणि इतर तालुक्यांतील ४० हून अधिक मंदिर विश्वस्त, पुरोहित व पुजारी उपस्थित होते.

बैठकीला संबोधित करताना महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी सांगितले की, “जोपर्यंत पुजारी मंडळे संघटित होऊन एकत्रितपणे आपल्या मागण्या मांडत नाहीत, तोपर्यंत शासन आणि प्रशासन त्याची गंभीर दखल घेणार नाही. मंदिरांचे सुव्यवस्थापन, संघटन आणि समन्वय यांद्वारेच मंदिर संस्कृतीचे प्रभावी संरक्षण होऊ शकते.”  बैठकीत मंदिर संस्कृतीचे संरक्षण, मंदिर व्यवस्थापनातील सुधारणा, देवस्थानांच्या जमिनींचे संरक्षण, मंदिर विकास आराखडा तसेच विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

तुळजापूर बैठकीत तुळजाभवानी मंदिर परिसरातील ब्रह्मदेव मूर्ती भंग प्रकरण, चौपदार दरवाजा काढताना झालेली मूर्तीची विटंबना, तसेच पुरातत्त्व विभागाच्या कथित मनमानी कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. संबंधित दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी उपस्थितांनी केली.

बैठकीत देवस्थानांच्या भूमी संरक्षणासाठी ‘अँटी लँड ग्रॅबिंग’ (भूमी बळकाव विरोधी) कायदा लागू करावा, तसेच ज्या प्रकारे अन्य धर्मीयांच्या धार्मिक स्थळांच्या संरक्षणासाठी वक्फ बोर्ड अस्तित्वात आहे, त्याच धर्तीवर हिंदूंच्या प्राचीन देवस्थानांच्या आणि मंदिरांच्या जमिनींच्या संरक्षणासाठी स्वतंत्र ‘सनातन बोर्ड’ स्थापन करावे, अशी मागणी एकमताने करण्यात आली.

बैठकीत पुढील महत्त्वाचे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले :

१. तुळजाभवानी मंदिर परिसरातील ब्रह्मदेव मूर्ती प्रकरणातील दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी.
२. देवस्थान मंदिर विकास आराखड्यात पुजारी, सेवेकरी आणि स्थानिक घटकांच्या मागण्यांचा समावेश करण्यात यावा.
३. पुरातत्त्व विभागाच्या मनमानी कारभाराची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.
४. मंदिरांची स्वायत्तता, परंपरा आणि धार्मिक अधिकार अबाधित ठेवण्यासाठी शासनाने ठोस धोरण जाहीर करावे.
५. हिंदू मंदिरांच्या संरक्षण, व्यवस्थापन आणि विकासासाठी स्वतंत्र ‘सनातन बोर्ड’ स्थापन करण्यात यावा.
६. महाराष्ट्र इनाम निर्मूलन अधिनियम २०२६ संदर्भात मंदिर संस्था, पुजारी आणि भाविकांनी सतर्क राहून एकत्रित भूमिका घ्यावी.
७. राज्यभरातील मंदिर, मठ, देवस्थान आणि धार्मिक संस्थांचे संघटन मजबूत करण्यासाठी व्यापक जनजागृती अभियान राबविण्यात यावे.

या बैठकीस महंत मावजीनाथ महाराज, महंत इच्छागिरी महाराज, किशोर गंगणे, बिपिन शिंदे, अमरराजे परमेश्वर (कदम), अनंत कोंडो, धनंजय लोंढे, महेश चोपदार, अजय साळुंखे, प्रशांत सोंजी (कदम), नागेश शास्त्री नंदीबुवा अंबुलगे, परीक्षित साळुंखे  राष्ट्र-भक्त अधिवक्ता परिषदेचे अधिवक्ता सतीश गाजुल, प्रज्ञापुरी ज्ञानपीठाचे तथा मंदिर महासंघाचे जिल्हा संयोजक प्रसाद पंडित, पंचमुखी हनुमान मंदिराचे विश्वस्त सत्यनारायण गुर्रम, मल्लिकार्जुन मंदिर शेळगीचे जगदीश पाटील, श्री मल्लिकार्जुन मंदिरचे मनोज हिरेहब्बू, श्री नागनाथ देवस्थान वडवळचे श्रीकांत शिवपुजे, पुरोहित संघटनेचे गोविंद गवई, नागनाथ देवस्थान शांती नगरचे रवींद्र कोळी, श्रीवैष्णव मारुती देवस्थानचे नारायण दुभाषी, श्री निवास पतंगे, सदगुरू प्रभाकर महाराज मंदिराचे बाळकृष्ण शिंगाडे, श्री अमोगसिध्द मंदिराचे संतोष पुजारी, जुने श्री विठ्ठल मंदिरचेश्री शैलेंद्र जोशी, हिंदू जनजागृती समितीच्या कु. वर्षा जेवळे,  मंदिर महासंघाचे श्री. विनोद रसाळ, श्री. धनंजय बोकडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

Post Views: 6
Previous Post

माजी सभापती संजय पाटील भिमानगर यांच्या पाठपुराव्याला यश!

Next Post

अभियांत्रिकी पद‌विका उन्हाळी परीक्षेत शिवाजी पॉलीटेक्निकचा शुभम माने जिल्ह्यात प्रथम

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
अभियांत्रिकी पद‌विका उन्हाळी परीक्षेत शिवाजी पॉलीटेक्निकचा शुभम माने जिल्ह्यात प्रथम

अभियांत्रिकी पद‌विका उन्हाळी परीक्षेत शिवाजी पॉलीटेक्निकचा शुभम माने जिल्ह्यात प्रथम

ताज्या बातम्या

“विठुरायाच्या भेटीसाठी लालपरी सज्ज! आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५,५०० विशेष बसेस – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

June 20, 2026
बटरफ्लाय इंग्लिश मीडियम स्कूल येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा

बटरफ्लाय इंग्लिश मीडियम स्कूल येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 20, 2026
प्रवेश प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सिंहगडचे मार्गदर्शन केंद्र विद्यार्थ्यांच्या सेवेत

प्रवेश प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सिंहगडचे मार्गदर्शन केंद्र विद्यार्थ्यांच्या सेवेत

June 20, 2026
ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात साजरा

ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात साजरा

June 20, 2026

३७ कर्मचारी-अधिकाऱ्यांना एका दिवसात तब्बल १ लाख ३ हजारांचा सर्वाधिक दंड

June 20, 2026

विकासाच्या वाटा रुंदावल्या रस्त्यांसाठी १०.५० कोटींची तरतूद

June 20, 2026

केंद्रप्रमुख विभागीय परीक्षा न्यायालयीन कक्षेत; नियुक्ती प्रक्रियेवर सर्वांचे लक्ष

June 20, 2026
पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात डॉ. पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता!

पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात डॉ. पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता!

June 20, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0923128

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697