सांगोला – महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांनी घेतलेल्या अभियांत्रिकी पदविका उन्हाळी परीक्षेत सांगोल्यातील शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. यामध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविकेचा ९०.७३, द्वितीय वर्षाचा ७७.२५, अंतिम वर्षाचा ९८.७३ टक्के निकाल लागला आहे. अंतिम वर्षाच्या शुभम माने, वैष्णवी भोसले व तनुजा मेटकरी, शाहिद मुजावर व द्वितीय वर्षाच्या मृदुला पाटील, अमृता मिसाळ, नेहा लेंडवे तसेच प्रथम वर्षाच्या आरती गंगाधरे, सबा इनामदार, प्रणवी देशमुख यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला.
प्रथम वर्षातील धनश्री माने, आदित्य खटकाळे, श्वेता गायकवाड, मोहित शिंदे, मयुरी शिंदे, ज्योती सूर्यवंशी, अक्षरा आहेरकर, शितल साळुंखे, सना इनामदार, गौरी मोरे, आरती सूर्यवंशी, अमृता शिंदे, कशिश खटकाळे, प्रांजली जाधव, द्वितीय वर्षातील सृष्टी काशीद, अंतिम वर्षातील शुभम वलेकर, ऋषिकेश शेंडगे, यशराज देशमुख, मेहुल शिंदे, पूजा राजगे, रंजीत देवकते, समीक्षा यादव, अदिती माने, तहूरा मुल्ला, स्वप्नाली दिवसे, कार्तिक चव्हाण, अविनाश गव्हाणे, वैष्णवी गायकवाड, सर्वज्ञ पांडे, प्रीती घाडगे, रोहित माने, साक्षी मेखले, सुमित शिंदे, प्रणाली पाटील, गणेश कोरे, अर्पिता इंगोले, स्वप्नाली शिंदे, शिवानी येलपले, सानिका साळुंखे, गौरी काटे, शितल सावंत, सविता बिले, शुभम वाघमारे, प्रवीण गायकवाड, प्राजक्ता गव्हाणे, चारुशीला नरळे, समीक्षा लिगाडे, सानिका पवार, यश बोत्रे, अपूर्वा झांबरे यांनी ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवले.
अप्लाइड मॅथेमॅटिक्स विषयात प्रज्वल चव्हाण, अभिजीत दुधाळ, अभिमन्यू भोसले, संस्कार बाबर, आरती गंगाधरे, सबा इनामदार, मयुरी शिंदे, गौरी मोरे, हर्षदा देवकते, साक्षी बुगडे, आरती सूर्यवंशी, प्रणव नलवडे, भारती घाडगे, करीना मुलाणी, अनुष्का शिंदे, मनीष भोसले, पायल माळी, वल्लभी पाटील, ओंकार जाधव, शितल साळुंखे, ज्योती सूर्यवंशी, विराज सोळगे, इंजीनियरिंग मेकॅनिक्स विषयात प्रणवी देशमुखे, डेटा कम्युनिकेशन अँड कॉम्प्युटर नेटवर्क विषयात मृदुला पाटील, मॅनेजमेंट विषयात शुभम माने, समीक्षा यादव, मशीन लर्निंग विषयात रंजीत देवकते, समीक्षा लिगाडे, इमर्जिंग ट्रेंड्स इन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विषयात शुभम माने, समीक्षा यादव, रोहित माने या विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवून कॉलेजचा नाव लौकिक वाढवला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, विश्वस्त मंडळ, प्राचार्य यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.