टेंभुर्णी : माढा तालुक्यातील रांझणी पंचायत समिती गणातील ग्रामीण भागाच्या विकासाला मोठी चालना देणारा निर्णय घेत विविध रस्ते विकास कामांसाठी तब्बल ₹3 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक झाल्यानंतर ग्रामीण भागातील प्रलंबित विकासकामांना वेग देण्याचे प्रयत्न सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून कोंढार परिसरातील महत्त्वाच्या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध झाला आहे.
या निधीसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे, युवा नेते रणजितसिंह शिंदे तसेच माजी सभापती संजय पाटील भिमानगर यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने गेल्या 50 वर्षों पासून रखडलेले कामे. या निधीमुळे अनेक गावांमधील दळणवळण व्यवस्था अधिक मजबूत होणार असून नागरिकांना सुरक्षित, जलद आणि सोयीस्कर प्रवासाचा लाभ मिळणार आहे.
ग्रामीण भागातील विकासासाठी रस्ते हा महत्त्वाचा घटक मानला जातो. अनेक वर्षांपासून काही मार्गांच्या दुरुस्ती व मजबुतीकरणाची मागणी स्थानिकांकडून केली जात होती. पावसाळ्यात या भागातील नागरिकांना वाहतूक आणि प्रवासात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. आता मंजूर झालेल्या निधीमुळे या प्रश्नांवर मोठ्या प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
मंजूर विकासकामे पुढीलप्रमाणे
• चांदज ते टनू रस्ता (साखळी 0/00 ते 3/00) – ₹50 लाख
• आलेगाव (बु.) ते आढेगाव (टाकळी) रस्ता (साखळी 0/00 ते 3/00) – ₹50 लाख
• नागोर्ली ते आढेगाव रस्ता (साखळी 0/00 ते 3/500) – ₹50 लाख
• वडोली ते चांदज रस्ता (साखळी 0/00 ते 2/500) – ₹50 लाख
• टेंभुर्णी ते कन्हेरगाव रस्ता (साखळी 0/00 ते 6/00) – ₹50 लाख
• टाकळी ते आलेगाव रस्ता (साखळी 0/00 ते 4/00) – ₹50 लाख
एकूण मंजूर निधी – ₹3 कोटी
या विकासकामांमुळे ग्रामीण रस्ते नेटवर्क अधिक सक्षम होणार असून शेतीमाल वाहतूक, विद्यार्थ्यांची ये-जा आणि स्थानिक व्यापारालाही चालना मिळणार असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीनंतर विकासकामांचा वेग वाढल्याचे चित्र या निधी मंजुरीतून दिसून येत आहे.
चौकट :
याबाबत बोलताना माजी सभापती संजय पाटील भिमानगर म्हणाले,
“ग्रामीण भागातील रस्ते सुधारणा, सुरक्षित प्रवास आणि सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी हा निधी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. निवडणुकीनंतर विकासकामांचा झपाटा वाढवण्याचा आमचा प्रयत्न असून आगामी काळात आणखी विकासकामे मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू राहणार आहे.”
Post Views: 7