अक्कलकोट – सोलापूर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळांच्या इमारतींची सद्यस्थिती तपासण्यासाठी तातडीने स्वतंत्र तांत्रिक ऑडिट करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रोजगार आघाडी (एकतावादी ) प्रदेश अध्यक्ष विकी चौधरी यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्याकडे देण्यात आले .
शाळांच्या इमारतींची मजबुती, वर्गखोल्या, छत, भिंती, फरशी, विद्युत व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित सर्व बाबींची प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल तयार करण्यात यावा.
तसेच शाळांच्या स्वच्छता व देखभाल व्यवस्थेची स्वतंत्र तपासणी करण्यात यावी. विद्यार्थ्यांना सुरक्षित व आरोग्यदायी वातावरण मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. विशेषतः ज्या शाळांच्या इमारती जुन्या किंवा धोकादायक स्थितीत आहेत, अशा शाळांची तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती अथवा पुनर्बांधणीबाबत कार्यवाही करण्यात यावी.विद्यार्थी सुरक्षा हा अत्यंत गंभीर विषय असून कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे.
त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळांचे इमारत ऑडिट, सुरक्षा ऑडिट व संबंधित सुविधांची स्वतंत्र तपासणी करून त्याचा अहवाल सार्वजनिक करण्यात यावा . आढळलेल्या त्रुटींची तातडीने पूर्तता करण्यात यावी सर्व मागण्यांची लवकरात लवकर पूर्तता करून विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी विनंती. , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे प्रदेशाध्यक्ष रोजगार आघाडी (एकतावादी) विकी चौधरी यांनी निवेदनात केली आही
Post Views: 4