सोलापूर -घराजवळील सीताफळाचे झाड का तोडले म्हणून एका वृद्ध महिलेस लाकडाने मारहाण करण्यात आल्याची घटना मोहोळ तालुक्यातील मुंढेवाडी येथे सोमवारी दुपारी घडली.
भामबाई लक्ष्मण चटके ( वय 60 वर्ष , राहणार मुंडेवाडी) असे त्या मारहाण झालेल्या महिलेचे नाव असून त्या सोमवारी दुपारी राहत्या घराजवळ असताना त्यांना सिताफळाचे झाड का तोडले असे म्हणून विठ्ठल गुंड व इतर तीन जणांनी मिळून लाकडाने मारहाण केली .यात सर्व अंगाला मुका मार लागल्याने त्यांना उपचाराकरिता येथील शासकीय रुग्णालयात रात्री साडेदहा वाजता जावई विशाल यांनी दाखल केले .
Post Views: 20