अक्कलकोट – शिवशाही फाउंडेशन भारत आयोजित स्कूल चले हम अभियान अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा भवानी नगर बादोले बु व जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा बादोले बु या दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप शिवशाही फाउंडेशन भारतचे संस्थापक अध्यक्ष बाळाराम रखमाजी माडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्तात्रय माडकर, माजी सरपंच बाजीराव खरात, विठ्ठल खरात, पांडुरंग सलगरे, विठ्ठल कत्ते, सिध्दाराम बिराजदार, भिमा कत्ते, सिकंदर भाईजान, बसवराज पाटील, मुख्याध्यापक अशोक लवटे सर,मुख्याध्यापक लायप्पा सुडगाडे सर, एस. एन. कलशेट्टी सर, व्ही. आर. पवार सर, नागनाथ बिराजदार सर, पुष्पाबाई तेलंगे मॅडम, निलिमा जाधव मॅडम यांच्या सह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना माडकर म्हणाले की आम्ही शिवशाही फाउंडेशन भारत स्कुल चले हम या अभियान अंतर्गत आजपर्यंत विदर्भ, कोकण, आदिवासी भागात, दुर्गम, डोंगरी भागात असलेल्या शाळेतील २३५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती दिली. शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या गोरगरीब विद्यार्थींचे नुकसान होऊ नये म्हणून आम्ही समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. आणि दरवर्षी तीन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करीत असल्याचे त्यांनी सांगितले. यंदाचे हे नववे वर्ष असल्याचे सागतानाच आज माझ्या जन्मभूमीतील असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा येथे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचे भाग्य लाभल्यामुळे अत्यानंद होत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागनाथ बिराजदार सर यांनी केले तर आभारप्रदर्शन मुख्याध्यापक अशोक लवटे सर यांनी केले.
Post Views: 17