Saturday, August 8, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

बार्शी क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यावरील गुन्ह्याच्या तपासाला उच्च न्यायालयाची स्थगिती 

तरुण भारतbyतरुण भारत
August 8, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
बार्शी – येथील शिवशक्ती मैदानावर क्रिकेट खेळपट्टी तयार करताना झालेल्या दुर्दैवी अपघातात एका अल्पवयीन खेळाडूचा मृत्यू झाल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या प्रकरणात बार्शी क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी आणि सभासद यांच्याविरुद्ध नोंदवलेल्या फौजदारी गुन्ह्याच्या पुढील तपासाला न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती संदेश डी. पाटील यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान अर्जदाराचे वकील ॲड. रुपेश बोबडे यांनी मांडलेला कायदेशीर युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला आणि हा दिलासादायक आदेश पारित केला.  नेमके प्रकरण काय?  ३० मे २०२६ रोजी बार्शीतील शिवशक्ती मैदानावर समर क्रिकेट कॅम्प सुरु असताना सकाळी ७ ते ७.३० च्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली होती. खेळपट्टी सपाट करण्यासाठी वापरण्यात येणारा जड मॅन्युअल पिच रोलर ओढत असताना १५ वर्षीय आरव ऊर्फ विरेन योगीराज चौधरी या खेळाडूचा तोल गेला आणि तो त्या फिरत्या रोलरखाली आला. या अपघातात छातीला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मयत मुलाचे वडील योगीराज चौधरी यांच्या फिर्यादीवरुन बार्शी शहर पोलीस ठाण्यात  भारतीय न्याय संहिता च्या कलम १०५ (सदोष मनुष्यवध) आणि ३(५) (समान हेतू) अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. या गुन्ह्यात प्रत्यक्ष मैदानावर असलेल्या प्रशिक्षकांसह बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनाही सहआरोपी करण्यात आले होते.
आपल्यावरील हा बार्शी क्रिकेट असोसिएशनच्या काही सभासदांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ३१ जुलै २०२६ रोजी न्यायमूर्ती संदेश डी. पाटील यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत अर्जदाराच्या वतीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, मैदानावर घडलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी असली तरी ती निव्वळ एक अपघात होता. भारतीय न्याय संहितेचे कलम १०५ लागू होण्यासाठी गुन्हेगारी हेतू किंवा मृत्यू ओढवू शकतो याची जाणीव असणे आवश्यक आहे. मात्र, एका क्रीडा सरावादरम्यान घडलेल्या अपघातात असा कोणताही हेतू सिद्ध होत नाही. शिवाय, अर्जदार हे केवळ असोसिएशनचे एक पदाधिकारी आहेत आणि या प्रत्यक्ष घटनेत त्यांचा कोणताही थेट सहभाग नाही. थेट सहभागाअभावी त्यांच्यावर BNS चे कलम १०५ लागू होऊ शकत नाही, त्यामुळे केवळ पदावर असल्याकारणाने त्यांच्यावर अशा प्रकारे गुन्हा दाखल करणे हा कायद्याचा गैरवापर असल्याचा युक्तिवाद करण्यात आला.  थेट सहभागाअभावी पदाधिकाऱ्यांवर कलम १०५ अन्वये कारवाई होऊ शकत नाही, हे मान्य करत न्यायालयाने राज्य सरकार आणि इतर प्रतिवाद्यांना नोटीस काढली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १४ ऑगस्ट २०२६ रोजी निश्चित करण्यात आली आहे. तोपर्यंत या प्रकरणात  अंतरिम दिलासा मंजूर करत सदर बार्शी पोलीस स्टेशनला नोंद गुन्ह्यात पुढील तपास व कारवाईला स्थगिती देण्याचे आदेश न्यायालयाने पारित केले आहेत. राज्य शासनाच्यावतीने सरकारी वकील माधवी म्हात्रे यांनी बाजू पाहिली.
उच्च न्यायालयाच्या या महत्त्वपूर्ण आदेशामुळे बार्शी क्रिकेट असोसिएशन आणि क्रीडा क्षेत्रातील संस्था चालवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Post Views: 16
Previous Post

गौडगांव -तुळजापूर रस्त्याचे खोदकाम सुरु , प्रवाशांच्या जीवाला धोका 

Next Post

शिवशाही फाउंडेशनच्या वतीने जि. प. प्राथमिक मराठी शाळा बादोले बु. येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
शिवशाही फाउंडेशनच्या वतीने जि. प. प्राथमिक मराठी शाळा बादोले बु. येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

शिवशाही फाउंडेशनच्या वतीने जि. प. प्राथमिक मराठी शाळा बादोले बु. येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

ताज्या बातम्या

किरकोळ वादातून तरुणाचा तिघांकडून खून

किरकोळ वादातून तरुणाचा तिघांकडून खून

August 8, 2026
महेश गायकवाड यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार हल्ला विरोधी समितीवर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती

महेश गायकवाड यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार हल्ला विरोधी समितीवर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती

August 8, 2026
ग्रामपंचायत अधिकारी दक्षिण तालुकाध्यपदी रमेश गायकवाड, सज्जाद काझी यांची सचिवपदी निवड

ग्रामपंचायत अधिकारी दक्षिण तालुकाध्यपदी रमेश गायकवाड, सज्जाद काझी यांची सचिवपदी निवड

August 8, 2026
ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये सोलापूरचे पहिले बजाज STEP ईव्ही प्रशिक्षण केंद्र सुरू!

ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये सोलापूरचे पहिले बजाज STEP ईव्ही प्रशिक्षण केंद्र सुरू!

August 8, 2026

सोलापुरात १५ नोव्हेंबरला मुस्लिम समाजातील ५१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा 

August 8, 2026
मिडवाईफपासून मेट्रनपर्यंतचा ३१ वर्षांचा सेवाप्रवास

मिडवाईफपासून मेट्रनपर्यंतचा ३१ वर्षांचा सेवाप्रवास

August 8, 2026
शिवशाही फाउंडेशनच्या वतीने जि. प. प्राथमिक मराठी शाळा बादोले बु. येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

शिवशाही फाउंडेशनच्या वतीने जि. प. प्राथमिक मराठी शाळा बादोले बु. येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

August 8, 2026

बार्शी क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यावरील गुन्ह्याच्या तपासाला उच्च न्यायालयाची स्थगिती 

August 8, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1038001

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!