धाराशिव येथे महाराष्ट्र अधंश्रध्दा निर्मुलन समितीच्या वतीने दि. 20/08/2026 रोजी नरेंद्र दाभोळकरांच्या स्मृती दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे अभिवादन करण्यात आले. यावेळी अमर रहे, अमर रहे डॉ. नरेंद्र दाभोळकर अमर रहे, लढेंगे, जितेंगे अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी ॲड. अजय वाघाळे यांनी डॉ. नरेंद्र दाभोळकरांनी समाजातील अंधश्रध्दा दूर व्हाव्यात यासाठी यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांनी समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन वाढविण्यासाठी प्रयत्न केले. सिध्देश्वर बेलोरे व गणेश वाघमारे यांनी डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या अंधश्रध्दा निर्मुलन कार्याची माहिती सांगितली. व्ही.एस. गायकवाड यांनी आज अंधश्रध्देचा स्तोम वाढत आहे. तेव्हा समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन वाढला पाहिजे. वैज्ञानिक दृष्टीकोन वाढण्यासाठी शालेय महाविद्यालयीन तसेच ग्रामीण पातळीवर प्रचार आणि प्रसार करण्याची गरज आहे असे सांगितले.
यावेळी अनिसाचे सुरेश शेळके, अतुल लष्करे इत्यादींची उपस्थिती होती.






















