टेंभुर्णी : माढा तालुक्याचे युवक नेते मा. रावसाहेब (नाना) देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आलेगाव खुर्द येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप सोहळा स्तुत्य व आदर्श सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. युवा नेते मा. राजेंद्र (आण्णासाहेब) अंगद पाटील यांच्या माध्यमातून गावातील तिन्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना उपयुक्त शालेय साहित्याचे अत्यंत उत्साहात वाटप करण्यात आले.
वाढदिवसाचा कोणताही बडेजाव किंवा अनावश्यक खर्च न करता, ग्रामीण भागातील चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत हा आनंद सोहळा साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माने वस्ती आलेगाव खुर्द येथे आयोजित या विशेष कार्यक्रमात तिन्ही शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार वह्या, कंपास पेटी, अंकलिपी, पॅड आणि आकर्षक पाण्याच्या बॉटल आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शालेय जीवनाच्या सुरुवातीलाच असे उपयुक्त साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद ओसंडून वाहत होता.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मेजर संतोष शिंदे, सरपंच सतीश केचे, उपसरपंच महेंद्र पाटील, प्रकाश केचे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मदन पवार, पै. नितीन केचे, देवराव दडस, बापुराव निकम, प्रकाश माने, हनुमंत काळे, कुंडलिक माने, तानाजी जानकर, मच्छिंद्र केचे, विजय वाळेकर, विष्णू केचे, सौदागर फुके, रामदास माने, तुकाराम केचे सागर कस्तुरे, रमेश लवटे, समाधान माने, अशोक गायकवाड, रामचंद्र पवार, तानाजी गायकवाड , धर्मेंद्र माने,भाऊसाहेब शिंदे, अमोल झोळ, महादेव जगताप, महेश आवारे, बिभीषण माने, पांडुरंग निकम, ज्ञानदेव केचे, संतोष काळे, मच्छिंद्र गायकवाड, विकास माने,राम काळे, गोरख केचे, पवन मदने,महादेव माने उमाजी जाधव, रोहीदास माने, माऊली कस्तुरे, मुख्याध्यापक धनाजी रुपनवर, काळबा भुतापल्ले, बाळासाहेब माने, मुलाणी सर आदींसह मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक, शिक्षकवृंद आणि समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजेंद्र (आण्णासाहेब) पाटील यांनी राबवलेल्या या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमाचे संपूर्ण माढा तालुक्यातून कौतुक होत आहे.
Post Views: 4