पंढरपूर : शासनाने राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू केला आहे. मात्र याचा त्रास शेतकऱ्यांना होत असल्यामुळे आमदार सदाभाऊ खोत यांनी शासनाला तुम्ही शेण व मूत्रामध्ये हात घालू नका, असा इशारा देवून चक्क गोहत्या बंदी कायद्यालाही आपला विरोध असल्याचे आमदार सदाभाऊ खोत यांनी सांगितले.
दोन दिवसांपूर्वी सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी मराठवाडा येथे जाऊन लाखो रुपयांची जनावरे खरेदी केली होती. ही जनावरे वाहनांमध्ये घालून ती सांगोल्याकडे नेत असताना पंढरपूर येथे गोरक्षकांनी वाहन अडविले व ही जनावरे कत्तल खात्याकडे घेऊन जात असल्याचा आरोप केला. याप्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागला. यामुळे काही शेतकऱ्यांनी आमदार सदाभाऊ खोत यांच्याशी संपर्क साधून त्यांना या प्रकाराची माहिती दिली.
दरम्यान यानंतर गुरुवारी (ता.२८) संध्याकाळी आमदार सदाभाऊ खोत पंढरपूर येथे आले. त्यांनी घटनेची माहिती घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, शासनानेगोवंशहत्या बंदी कायदा लागू केला आहे. मात्र याचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागतआहे. शासनाने शेणामध्ये हात घालण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा खोतयांनी दिला आहे.
वास्तविक पाहता भाजपमुळेच शेतकरी नेते सदाभाऊ खोत हे आमदार झालेले आहेत. तरीही राज्य शासनाला त्यांनी इशारा दिला असल्यामुळे त्यांच्या या इशाऱ्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगू लागली आहे.
Post Views: 9