सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रभाग क्रमांक 18 चे नगरसेवक प्रशांत पल्ली यांच्यावतीने महापालिका विभागीय कार्यालय (झोन) क्रमांक 4 च्या कर्मचाऱ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
झोन क्रमांक 4 अंतर्गत गुरुनानक चौक येथील महानगरपालिकेचे कार्यालय तसेच उजनी कॉलनी येथील झोन कार्यालयातही जयंती मोठ्या उत्साहाने साजरी झाली.
या सोहळ्याला झोन क्रमांक ४ चे झोन अधिकारी जगधनी, झोनचे कर्मचारी तसेच भाजप व्यापारी सेलचे अध्यक्ष मनोज पिस्के, भाजप ओबीसी सेलचे अध्यक्ष विजय महिंद्रकर, उद्योजक श्रीनिवास गुंडेली, सनी बगाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.




















