बार्शी – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर २ उपळाई (ठों) येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक अनिल काळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर शाळेतील विध्यार्थी कु.स्वरा खोडवे, कु.आनंदी माळी, कु. आरोही ठोगे, कु. वैष्णवी माळी, कु. तन्वी ठोगे या विध्यार्थ्यांची भाषणे झाली. शाळेचे मुख्याध्यापक अनिल काळे, आनंद घाडगे, प्रभाकर काटे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा परिचय करुन दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद घाडगे यांनी तर ते आभार प्रभाकर काटे यांनी मानले. यावेळी शाळेतील शिक्षक हरिभाऊ दळवी, श्रीमती वैशाली खुने, श्रीमती मीरा गरड व दिपाली गोरे उपस्थित होत्या.




















