करकंब – पंढरपूर येथील आषाढी वारी निमित्त श्री विश्वधारा आयुर्वेदिक प्रतिष्ठानच्या डॉ.श्रध्दा कदम यांच्या वतीने मोफत उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या मोफत आरोग्य शिबिरामध्ये ३००० वारकऱ्यांवर मोफत उपचार करण्यात आले.श्री विश्वधारा आयुर्वेद प्रतिष्ठान यांच्या वतीने सलग ४ वर्षांपासून आषाढी वारीमध्ये मोफत आरोग्य शिबिराचे आयोजित करण्यात येत आहे.श्री विश्वधारा आयुर्वेद प्रतिष्ठानच्या आषाढी वारीतील मोफत आरोग्य शिबिरामध्ये डॉ.श्रीधर यलमार,डॉ.श्रीकांत खटावकर,डॉ.कैलास नरळे,डॉ.किरण थोरात,डॉ.स्वप्नील बारी,निलेश जगताप,दिपाली सतपाल,सारिका आरफा खाटीक,पूजा मॅडम यांनी परिश्रम घेतले. या शिबिरासाठी रेखा चंद्रराव यांनी सहकार्य केले.आषाढी वारीमध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात वारकरी पंढरपूर येथे दाखल झाले होते. पावसाळी वातावरणामुळे वारकऱ्यांना,थंडी,ताप,अंगदुखी, डोकेदुखी,केदुखी मळमळणे अशा प्रकारचे आजार झाले होते.या सर्वांवरती मोफत उपचार करण्यात आले.या शिबिरास पोलीस उपअधीक्षक हिम्मत जाधव,उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी भेट दिली.
Post Views: 8