मंगळवेढा – आयुष्यात विदयार्थ्यांनी आपल्या मनाला चौकट न घालता कान आणि डोळे उघडे ठेवून मोठे स्वप्न बघितले पाहिजे आणि ते स्वप्न सत्यात कसे उतरेल यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजे असे मत श्री विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष राहुल शहा यांनी व्यक्त केले ते श्री संत दामाजी महाविद्यालयात बारावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या गुणवंत विदयार्थ्यांच्या सत्कार समारंभात बोलत होते.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी बोर्ड प्रमाणपत्र परीक्षेत शास्त्र विभागातून प्रथम प्रिती संजय हंगरगे,द्वितीय अमर प्रधान मनगेनी,तृतीय दिक्षा भाऊसाहेब ढगे वाणिज्य विभागातून प्रथम गार्गी औदुंबर माने,द्वितीय ज्ञानेश्वर गणपती लुगडे, तृतीय सोनम धेनू जाधव तर कला शाखेतून प्रथम गौरव संजय राठोड,द्वितीय यशश्री श्रीरंग चंदनशिवे,तृतीय अस्मिता विनायक जगताप आदी सर्व यशस्वी गुणवंत झालेल्या विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या वतीने अध्यक्ष राहुल शहा,प्राचार्य डॉ औदुंबर जाधव,उपप्राचार्य प्रा राजेंद्र गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी शहा म्हणाले आज स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील आणि मराठी शाळेतील विद्यार्थीच यशस्वी होताना दिसत आहे यासाठी मातृभाषेतूनच शिक्षण घेणे आवश्यक आहे विदयार्थ्यांच्या यशामुळे निश्चितच महाविद्यालयाची शैक्षणिक उंची वाढलेली असुन पालकांनी महाविद्यालयावरती विश्वास दाखविल्याबद्दल त्यांनी आभार मानत विदयार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या यावेळी प्राचार्य डॉ औदुंबर जाधव आणि उपप्राचार्य प्रा राजेंद्र गायकवाड यांनीही विदयार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या तर गुणवंत विदयार्थ्यांनी आम्हाला मिळालेल्या यशामध्ये महाविद्यालयाचा मोठा वाटा आहे असे सांगत सर्व शिक्षकांचे आभार मानले तसेच यावेळी वरिष्ठ विभागातील इतिहास विभागाची विदयार्थ्यांनी प्रज्वला विठोबा क्षीरसागर हिची मिरा भाईदंर मुंबई पोलीस पदी निवड झाल्याबद्दल तीचा देखील सत्कार करण्यात आला यशस्वी विदयार्थ्यांचे संस्थेचे सर्व पदाधिकारी,सभासद यांनी अभिनंदन केले यावेळी पालक,शिक्षक,शिक्षिका उपस्थित होते प्रा विनायक कलुबर्मे यांनी कौतुक समारंभाचे सूत्रसंचालन करून आभार मानले
























