Wednesday, June 3, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

नाताळाच्या सुट्यांमुळे पंढरपूरात भाविकांची तोबा गर्दी, चौफाळ्यासह शहरातील महत्वाच्या चौकात होतेय वाहतूक कोंडी

तरुण भारतbyतरुण भारत
December 29, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – सध्या सुरु असलेल्या नाताळच्या सुट्यांमुळे धार्मिक पर्यटनासाठी येथे मोठी गर्दी होत आहे. पोलिसांकडून भाविकांच्या वाहनांना कोणतीही शिस्त लावली जात नसल्यामुळे शहारातील चौफाळ्यांसह महत्त्वाच्या प्रत्येक चौकामध्ये  वारंवार वाहतूकीची कोंडी होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य पंढरपूरकर नागरिक वैतागून गेलेला आहे. सर्रास भाविकांची चारचाकी वाहने मंदिर परिसरात येत असल्यामुळे वाहतूक पोलिस कुठे आहेत ? पोलिसांची वाहतूक शाखा  करते काय आहे ? असे एक ना अनेक संतप्त सवाल सर्वसामान्य पंढरपूरकरांमधून उपस्थित केले जात आहे.

सध्या नाताळाच्या सुट्टींचे दिवस आहेत. त्यामुळे धार्मिक पर्यटना बरोबरच विठुरायाच्या दर्शनासाठी परगावांहून येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त आहे. भाविकांच्या गर्दीमुळे शहरातील सर्व मठ,धर्मशाळा, भक्तनिवास, भाविकांच्या गर्दीने फुल्ल झालेली दिसत आहेत. त्यामुळे भाविकांनी आणलेली चारचाकी वाहने चक्क बिनदिक्कपणे पार्किंग ऐवजी रस्त्यांवरच दिसत आहे. त्यामध्येच काही वाहनधारकांकडून वाहतुकीचे नियम पाळले जात  नसल्यामुळे शहरात वारंवार वाहतूकीची कोंडी निर्माण होत आहे. या मध्ये भरीसभर म्हणून बेदरकारपणे वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांमुळे रोजच छोट्या, मोठ्या अपघाताला देखील निमंत्रण दिले जात असल्याचे गेल्या काही दिवसां पासून दिसून येत आहे. मात्र वाहतूक पोलिस हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहून देखील बेजबाबदार वाहनचालकांवर कोणतीच कारवाई करताना दिसत नाहीत ही मात्र आश्चर्याची गोष्ट आहे. 

शहरातील विठ्ठल मंदिराच्या पश्चिमव्दारा समोरच चौफाळा चौक आहे. त्यापुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक या बरोबरच कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय चौक, प्रबोधनकार ठाकरे चौक, अर्बंन बँक, संतपेठ, सांगोला रस्ता चौक, भादुले चौक, नाथचौक आदी महत्वाच्या परिसरात मोठमोठी दुकाने, रुग्णालये, हॉटेल,  महाविद्यालय, मैदान आहेत.  या परिसरात भाविकांच्या वाहनांची देखील नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे या परिसरात दिवसरात्र रहदारी असते.  त्यामानाने शहरात पार्किंगच्या व्यवस्था अपुऱ्या आणि तोकड्या आहेत. त्यामुळे भाविकांकडून सर्रासपणे शहरातील प्रमुख रस्त्यांवरच गाड्या पार्किंग केल्या जातात. अगदी नगरप्रदक्षिणा रस्त्यावर देखील या पेक्षी वेगळी परिस्थिती दिसत नाही. 


दरम्यान तुळजापूर, अक्कलकोट येथे परगावाहून येणाऱ्या भाविकांच्या गाड्या सर्रास शहराबाहेर पार्किंगच्या ठिकाणी थांबवाव्या लागतात. त्यानंतरच चालत भाविकांना त्या त्या ठिकाणच्या देवतांचे दर्शन करता येते. मात्र पंढरपूरात परिस्थिती अगदी उलटी दिसत आहे. भाविकांची मोठी वाहने देखील अगदी चौफाळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून गावभागात सोडली जातात. त्यामुळे गर्दीच्या वेळी म्हणा किंवा ऐरव्ही देखील शहराच्या प्रत्येक चौकाचौकांमधून वाहतूकीची कोंडी होताना दिसते. त्यामुळे सर्वसामान्य पंढरपूरकर वारंवार होणाऱ्या या वाहतूकीच्या कोंडीला जाम वैतागून गेल्याचे दिसत आहे. ऐरव्ही रस्त्यांच्या कडेला शहरातील नागरिकांचे नजरचुकीने वाहन आढळल्यास बेमालुमपणे चालन फाडणारे वाहतूक पोलिस ऐन गर्दीच्या वेळी कुठे असतात असा संतप्त सवाल शहरवासियांकडून आता विचारला जात आहे. 
————————

वारंवार वाहतूक कोंडीची प्रमुख ठिकाणे
शहरातील प्रमुख अंबाबाई पटांगण, जुनीपेठ,नवीन पेठ, चौफाळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, काळामारुती चौक,कालिका देवी चौक, भजनदासचौक, गजानन महाराज मठ परिसर, संपुर्ण प्रदक्षिणा रस्ता, स्टेशन रोड, केबीपी काँलेज रस्ता, अहिल्यापुल रस्ता, तहसील कचेरी समोरील रस्ता, भक्तीमार्ग, अर्बंन बँक मुख्य शाखा रस्ता, भादुले चौक, नगरपालिका समोरील रस्ता, संतपेठ, सांगोला चौक रस्ता, गोपाळपूर रस्ता, विवेक वर्धिनी समोरील रस्ता, अंबाबाई पटांगण या शिवाय शहर परिसरातील इतर काही रस्त्यांवर देखील वाहतूकीची प्रचंड कोंडी होत आहे.
———————–


स्वयंचलित सिंग्नल यंत्रणा बंद अवस्थेत
नागरिकांच्या घामाच्या (कररुपातील ) पैशातून लाखो रुपये खर्चुन उभारण्यात आलेली स्वातंत्र्यवीर सावरकर चौकातील स्वयंचलित सिंग्नल यंत्रणा देखील अनेक वर्षापासून बंद अवस्थेतच आहे. ही स्वयंचलित सिंग्नल यंत्रणा सुरु ठेवल्यास मुख्य सावरकर चौक, स्टेशन रस्ता येथील वाहतूकीला बऱ्या शिस्त लागण्यास मदत होईल.

Post Views: 46
Previous Post

सांगोलच्या जनतेने मला कधीच शून्य होऊ दिले नाही- माजी आ.शहाजीबापू पाटील 

Next Post

नगरसेवकांचा रशीद खिस्तके वतीने सत्कार

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

नगरसेवकांचा रशीद खिस्तके वतीने सत्कार

ताज्या बातम्या

जेईई अँडव्हान्स्डमध्ये वालचंदच्या विद्यार्थ्यांची भरारी; आयआयटीच्या दिशेने दमदार झेप

जेईई अँडव्हान्स्डमध्ये वालचंदच्या विद्यार्थ्यांची भरारी; आयआयटीच्या दिशेने दमदार झेप

June 2, 2026
मिशन खेलो इंडिया! सोलापूर विद्यापीठाचा खेळाडूंसाठी ‘स्पेशल प्लॅन’

मिशन खेलो इंडिया! सोलापूर विद्यापीठाचा खेळाडूंसाठी ‘स्पेशल प्लॅन’

June 2, 2026
सोलापुरात ५०० जणांचा सामूहिक वाढदिवस सोहळा उत्साहात

सोलापुरात ५०० जणांचा सामूहिक वाढदिवस सोहळा उत्साहात

June 2, 2026

सांगोला महाविद्यालयात सेवानिवृत्ती निमित्त सपत्नीक सत्कार

June 2, 2026
‘​मॉडेल’चा नॅशनल अकॅडमीवर दणदणीत विजय

‘​मॉडेल’चा नॅशनल अकॅडमीवर दणदणीत विजय

June 2, 2026
चंद्रभागेचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी केवळ शासन,पालिका आणिमंदिर समितीची नाही तर ती सर्वांचीच

चंद्रभागेचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी केवळ शासन,पालिका आणिमंदिर समितीची नाही तर ती सर्वांचीच

June 2, 2026
ईगल्स व रायडर्स संघांचे थरारक विजय; ​ऋग्वेद पाटील आणि अथर्व हलकुरकी सामन्याचे मानकरी 

ईगल्स व रायडर्स संघांचे थरारक विजय; ​ऋग्वेद पाटील आणि अथर्व हलकुरकी सामन्याचे मानकरी 

June 2, 2026

विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांनी हयात दाखले व दिव्यांग प्रमाणपत्र जमा करा 

June 2, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0890972

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697