Sunday, August 9, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

वर्क फ्रॉम व्हिलेज’ च्या माध्यमातून ग्रामीण भारताचे आर्थिक सबलीकरण शक्य –  पद्मविभूषण डॉ. काकोडकर

तरुण भारतbyतरुण भारत
May 5, 2026
in editor
0
वर्क फ्रॉम व्हिलेज’ च्या माध्यमातून ग्रामीण भारताचे आर्थिक सबलीकरण शक्य –  पद्मविभूषण डॉ. काकोडकर
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – ‘संकल्पने पासून ते शेवटच्या ग्राहकापर्यंत एखादी गोष्ट पोहोचवण्याचाप्रवास म्हणजेच इनोव्हेशन होय.औद्योगिक युगात ‘शहराकडे चला’ अशी मानसिकता निर्माण झाली होती, मात्र आजच्या ज्ञानयुगात ‘डिजिटल तंत्रज्ञाना’मुळे ‘वर्क फ्रॉम होम’ प्रमाणेच ‘वर्क फ्रॉम व्हिलेज’ ही संकल्पना प्रत्यक्षात साकारतायेणे शक्य आहे.

ग्रामीण भागातील तरुणांना शहराप्रमाणे साधने उपलब्ध करून दिल्यासदेशाची आर्थिक विषमता कमी होऊन खऱ्या अर्थाने प्रगती साधता येणे शक्य आहे.  इनोव्हेशन पुढे नेण्यासाठी पूरकवातावरण निर्मिती करणे आवश्यक असून शहरापेक्षा ग्रामीण भागात इनोव्हेशन इकोसिस्टमनिर्माण करणे अवघड आहे. पण, हे करणे महत्वाचे आहे. यामुळे एसीआयसीच्या माध्यमातूनग्रामीण भागाचे शिक्षणाद्वारे सबलीकरण होईल.’ असे प्रतिपादन विख्यातअणुशास्त्रज्ञ तथा भारतीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी केले.         

येथील स्वेरी महाविद्यालया मध्ये आयोजिलेल्या ‘अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर या केंद्राच्या उदघाटन प्रसंगी पद्मविभूषण डॉ. काकोडकर हेउपस्थितांना मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंढरपूर-मंगळवेढाविधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे हे होते. 

या वेळी एसीआयसीचे सल्लागार व सोबस इन्साईट फोरमचे संस्थापक दिग्विजय चौधरी, एसीआयसी स्वेरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष भुतडा, सल्लागार रेशा पटेल आदींनी मार्गदर्शन केले. 

अध्यक्ष स्थानावरून बोलताना आमदारसमाधान आवताडे म्हणाले की, ‘देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीसंशोधन क्षेत्रात विशेष निधी उपलब्ध करून दिला असून या माध्यमातून संशोधन झालेपाहिजे यासाठी नाविन्यपूर्ण विचार पुढे येण्याची गरज आहे. कमी वेळेत उत्कृष्ठदर्जाचे उत्पादन झाल्यास निश्चितपणे स्वप्नातील भारत अवतरणार आहे. भारताच्या जडणघडणीत शास्त्रज्ञ डॉ.काकोडकर यांचा मोलाचा वाटा आहे. जर देशाची पाच ट्रीलीयनडॉलर इकॉनॉमी करायची असेल तर नवनवीन तंत्रज्ञान, प्रयोगांची निर्मिती, संशोधन झाले पाहिजे. संशोधन केंद्र, बचत गट, याद्वारे उद्योजक तयार व्हावेत. एकूणच एसीआयसी – स्वेरी या केंद्राच्या माध्यमातून झालेल्या संशोधनातून एका नालंदा विद्यापीठाच्या प्रतिकृती निर्मिती करणे ही आहे. या केंद्रामुळे ग्रामीण भागातील तरुणांमध्ये असलेल्या कल्पकतेला मोठी चालना मिळणार आहे. हे मात्र नक्की ! म्हणून तुम्ही केंद्राच्या माध्यमातून कार्य करत रहा, आवश्यक असेल त्या ठिकाणी आम्ही प्रशासनाच्या माध्यमातूनपाठपुरावा करू.’ असे आश्वासनआवताडे यांनी दिले.  

यावेळी स्वेरीचे सर्वेसर्वा डाँ.बी.पी.रोंगे, सौ.सुयशा काकोडकर, डॉ. जान्हवी गांगल, तन्मय मुखर्जी, अनघा पाठक, महेश पाठक, शरद भोसले, स्वप्नील कांबळे, आर्ट ऑफ लिव्हिंगचे डॉ. माधव पोळ, कामगार आयुक्त दत्ता पवार, पांडुरंग साखर कारखान्याचे संचालक दिलीप गुरव, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वंदना बीडकर, अनिता पवार, विलास मस्के, आर्किटेक्ट यादगिरी कोंडा, शेतकरी, महिला बचत गटातील महिला वर्ग, प्रशासकीय व सामाजिक क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी, स्वेरीचे अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत, सचिव डॉ.सुरज रोंगे, माजी अध्यक्ष व विश्वस्त प्रा.सी.बी.नाडगौडा, धनंजय सालविठ्ठल, विश्वस्त एन.एम. पाटील, विश्वस्त एच. एम.बागल,विश्वस्तबी.डी.रोंगे, स्वेरी अंतर्गत असलेल्या पाचही महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्या, अधिष्ठाता, विभागप्रमुख, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या केंद्रासाठी डॉ.हर्षवर्धन रोंगेहे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. सूत्रसंचालन डॉ.नीता तळवलकर यांनी केले तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत  पवार यांनी आभार मानले.

 ——————

केंद्र हे भविष्यात अनुकरणीय माँडेल बनेल  

डॉ.काकोडकर म्हणाले की, ‘इनोव्हेशनची सुरुवात ही तळागाळातील माणसांच्या गरजांमधून होते. भारताची मोठी लोकसंख्या असून ग्रामीण भागातील तरुणाई हीच आपली सर्वात मोठी जमेची बाजू आहे. युवकांच्या माध्यमातून नवनवीन संकल्पना प्रत्यक्षात साकार करता येतील. यातून केवळ शहरांचे उदात्तीकरण करण्यापेक्षा ग्रामीण भागातच उत्पादनाची साधने विकसित करणे ही काळाची गरज आहे. पंढरपूर मध्ये औद्योगिक वसाहत निर्माण झाल्यास येथील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पंढरपूर सारख्या ग्रामीण भागाचा विकास झपाट्याने होईल. ज्या  ठिकाणी आर्थिक विषमता कमी होते तेथील विकास झपाट्यानेहोतो. एकूणच स्वेरीतील एसीआयसी केंद्र भविष्यात अनुकरणीय मॉडेल बनेल.’ असा विश्वास डॉ. काकोडकर यांनी व्यक्त केला. 

Post Views: 36
Previous Post

ओम गाटेला बारावी परीक्षेत 91.67 टक्के गुण; दैदीप्यमान यश केले संपादन

Next Post

पंचायत समिती भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी सभापती पै. दत्ता मगर यांनी थोपटले दंड

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
पंचायत समिती भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी सभापती पै. दत्ता मगर यांनी थोपटले दंड

पंचायत समिती भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी सभापती पै. दत्ता मगर यांनी थोपटले दंड

ताज्या बातम्या

अखिल भारतीय मल्हार रक्षक संघटना मुख्यमंत्र्यांना विचारणार धनगर आरक्षणाचा प्रश्न

August 9, 2026

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने मशाल रॅली

August 9, 2026

55 वर्षीय रुग्णाला ओपीडी मध्ये आला हृदयविकाराचा झटका त्वरित सीपीआर देऊन वाचवले प्राण

August 9, 2026

मित्राच्या सांगण्यावरून पोटच्या मुलीने केली चोरी

August 9, 2026

आईशक्ती फाउंडेशनतर्फे ४०० गरजू मुलींना शालेय साहित्याचे वाटप

August 9, 2026
किरकोळ वादातून तरुणाचा तिघांकडून खून

किरकोळ वादातून तरुणाचा तिघांकडून खून

August 8, 2026
महेश गायकवाड यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार हल्ला विरोधी समितीवर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती

महेश गायकवाड यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार हल्ला विरोधी समितीवर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती

August 8, 2026
ग्रामपंचायत अधिकारी दक्षिण तालुकाध्यपदी रमेश गायकवाड, सज्जाद काझी यांची सचिवपदी निवड

ग्रामपंचायत अधिकारी दक्षिण तालुकाध्यपदी रमेश गायकवाड, सज्जाद काझी यांची सचिवपदी निवड

August 8, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1041853

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!