सदाशिवनगर – माळशिरस पंचायत समिती कार्यालयात प्रशासकीय काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला असून माझ्या या सभापती कार्यकाळात विकास कामाबरोबर भ्रष्टाचाराचे निर्मुलन करणार असल्याचा निर्धार पंचायत समितीचे नूतन सभापती यांनी प्रत्रकार परिषदेत व्यक्त करीत त्यांनी भ्रष्टाचारा विरोधात दंड थोपटले असून नागरिकांना पंचायत समिती कामकाजात काही अडचणी येत असल्यास अथवा काही तक्रार असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करून पाणी टंचाईवर लक्ष केंद्रित केल्याचे सांगितले .
नूतन सभापती यांनी नुकताच महिन्यापूर्वी सभापती पदाचा पदभार स्विकारला आहे.या कालावधीत कामकाजाबाबत माहिती जाणून घेतली.तालुक्यातील अनेक नागरिक भेटले प्रत्येकांनी सत्कार केल्यानंतर तक्रारीचे पाढेच माझ्या समोर वाचले,सर्व सामान्यांना योजनांचा लाभ घेताना किती त्रास सहन करावा लागतो समजून आले.अधिकारी वेळेवर कार्यालयात येत नसल्याचे निदर्शास आल्यानंतर स्वत कार्यालयीन वेळेअगोदर प्रवेशद्वारावर थांबलो असता अनेक अधिकारी वेळेवर येत नसल्याचे दिसून त्यांना समज दिली आता त्यात बदल झाला असून कर्मचारी अधिकारी वेळेत येऊ लागले आहेत.
शासनाच्या अनेक योजना राबविल्या गेल्या आहेत परंतु त्याचे पूर्णत्व केवळ कागदावरच असल्याचे दिसून येत आहे.जलजिवन सारख्या योजना राबविल्या गेल्यात परंतु त्या पूर्ण झाल्याचे सांगितले जाते परंतु नागरिकांना पाणीच मिळत नसल्याच्या तक्रारी आल्या असून ठेकेदार व अधिकारी यांचे लागेबांधे असल्याने कामे दर्जेदार झाली नाहीत.
रोजगार हमी योजने अंतर्गत दिल्या जाणाऱ्या विहिरीसाठी मोठ मोठ्या रकमा घेतल्याजात असल्याच्या तक्रारी आहेत.कार्यालयातील अधिकारी ,कर्मचारी यांचा मनमानी कारभार चालू देणार काही प्रत्येक तक्रारीची चौकशी करून दोषीवर कारवाई करणार असून माझ्या कार्यकाळात भ्रष्टाचाराचे निर्मुलन करणार असल्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
काही महिन्यापूर्वी येथील विहीर प्रकरणाचा मोठा गाजावाजा झाला होता . गटविकास अधिकाऱ्यांस.मारहाण केल्याचा गुन्हाही दाखल झाला होता.तर बदली झाल्यानतरही कार्यालयात येऊन एका गटविकास अधिकारी यांनी विहिरींना मंजुरी दिल्याची चर्चा होती तर त्यानंतर आलेल्या गटविकास अधिकारी यांनी हे कामकाज थांबवले होते .विहिरीचे काम मशीनने काम केल्याचे उघड झाल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता अशी चर्चा सर्वत्र आहे.त्यातच पैसे घेतल्याचा आरोप होत असल्याने याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

























