सांगोला – राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्याबाबत खा.संजय राऊत यांनी केलेल्या बेताल, बेजबाबदार व आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी, सांगोला यांच्या वतीने सोलापूर जि.प.शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार-सावंत आणि भाजपचे बाळासाहेब एरंडे यांच्या नेतृत्वाखाली वासूद चौक येथे तीव्र रस्ता रोको आंदोलन करत पुतळ्याचे दहन करण्यात आले. याप्रसंगी मारुतीआबा बनकर, बाळासाहेब काटकर, सुदर्शन इंगवले, मंडल अध्यक्ष विजय मगर, दादासाहेब खरात, बाळासाहेब झपके, पोपट गडदे, प्रशांत वलेकर, नंदकुमार दिघे, विजय बाबर, विजय इंगोले, सुभाष पवार, सिद्धेश्वर गाडे, प्रवीण जानकर, गोटू इमडे, ॲड.सुशांत फुले, उल्हास धायगुडे सहभागी झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी खा.संजय राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून पुतळा दहन केले. तसेच त्यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवून भविष्यात अशा बेजबाबदार विधानांपासून परावृत्त होण्याचे आवाहन करण्यात आले. आंदोलनादरम्यान काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांच्या उपस्थितीत आंदोलन शांततेत पार पडले. आंदोलनाच्या शेवटी भाजपच्या वतीने ना.जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत अशा बिनबुडाच्या आरोपांविरोधात भविष्यातही लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
चौकट-
ना.जयकुमार गोरे हे जनतेच्या विश्वासावर उभे असलेले विकासाभिमुख नेतृत्व आहे. त्यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही. भारतीय जनता पार्टी प्रत्येक कार्यकर्त्याच्या बळावर अशा बेताल वक्तव्यांना लोकशाही मार्गाने ठाम उत्तर देईल.
-चेतनसिंह केदार-सावंत, सभापती,
सोलापूर जि.प.शिक्षण व आरोग्य समिती
Post Views: 4