सोलापूर : अखिल भारत गुजराती समाज या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेवर महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी अध्यक्ष म्हणून श्री मोहन भाई पटेल (नागपूर) यांची निवड करण्यात आली असून. तसेच श्री सोलापूर गुजराती मित्रमंडळाचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र गुजराती महामंडळाचे उपाध्यक्ष श्री मुकेश मेहता यांची कार्यकारिणी सदस्य पदावर नियुक्ती करण्यात आली.
या संस्थेचे मुख्य संवर्धक हे गुजरातचे मुख्यमंत्री श्री भूपेंद्रभाईपटेल असून ही संघटना विविध संघटनात्मक आणि सामाजिक कार्य करीत आहेत. ही संस्था प्रत्येक राज्यात स्थापन करण्यात आली आहे
















