सांगोला – सांगोला येथील दिपकआबा साळुंखे-पाटील प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीसाठी संचालक मंडळाची सभा नुकतीच पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक सहकारी अधिकारी ए.डी.गोसावी होते. चेअरमन पदासाठी संजय गायकवाड यांचा तर व्हा.चेअरमन पदासाठी पल्लवी मेणकर-महाजन यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला. त्यामुळे दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा ए.डी.गोसावी यांनी केली. या प्रसंगी संस्थेच्या संचालिका कमल खबाले, विलास डोंगरे, गोविंद भोसले, दत्तात्रय बुंजकर, दिलीप घाडगे, प्रफुल्लकुमार आमले तसेच सुहास कुलकर्णी, गुलाबराव पाटील, मोहन आवताडे, वसंत बंडगर, बाबासाहेब इंगोले, संतोषकुमार निंबाळकर, अमर कुलकर्णी, विनोद पाटील, बाळासाहेब चंदनशिवे, प्रशांत गायकवाड, दादाराजे जगताप, मनोहर काशीद, हरिश्चंद्र सावंत उपस्थित होते.