Friday, September 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

प्रधानमंत्री पोषणशक्तीचा नवीन पंधरवडा ! 

तरुण भारतbyतरुण भारत
August 22, 2026
in solapur
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर – शाळेतील विद्यार्थ्यांच्या ताटात आता केवळ भात-डाळीपुरते मर्यादित न राहता कडधान्ये आणि विविध पौष्टिक पदार्थांची भर पडणार आहे. ‘प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजने’अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात नवीन पंधरवडा पाककृती तक्ता लागू करण्यात आला असून, विशेषतः दर गुरुवारी विद्यार्थ्यांना नियमित आहारासोबत पूरक पोषण आहार दिला जाणार आहे. या बदलामुळे जिल्ह्यातील ४ लाख ५७ हजार ५४९ विद्यार्थ्यांच्या आहारात विविधता येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने ऑगस्टपासून नव्या मेनूची अंमलबजावणी सुरू केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे गटशिक्षणाधिकारी, ‘पीएम पोषण’ योजनेचे अधीक्षक तसेच महापालिका शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकाऱ्यांना याबाबत कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.
नवीन पाककृतीमध्ये मूगडाळ, मटकी, चवळी आणि वाटाणा यांसारख्या कडधान्यांना विशेष स्थान देण्यात आले आहे. प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी प्रतिविद्यार्थी २० ग्रॅम, तर उच्च प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी ३० ग्रॅम या प्रमाणात कडधान्यांचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या आहारातील पोषणमूल्य वाढविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
आठवड्याच्या मेनूमध्ये व्हेजिटेबल पुलाव किंवा मसालेभात, वरण-भात, मूगडाळ खिचडी, मोड आलेल्या मटकीची उसळ आणि चवळी खिचडी अशा पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. गुरुवारी सुट्टी असल्यास पुढील कामकाजाच्या दिवशी पूरक आहार देण्यात येणार आहे. सुमारे ४ हजार ९६ शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत हा बदल पोहोचणार असल्याने नव्या मेनूची काटेकोर अंमलबजावणी झाल्यास शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेत आणि विविधतेत लक्षणीय बदल होण्याची अपेक्षा आहे.
चौकट
‘अतिरिक्त अनुदान’ नाही
नव्या पूरक आहारासाठी स्वतंत्र अतिरिक्त अनुदान दिले जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. उपलब्ध यंत्रणा आणि नियोजित तरतुदीतूनच या मेनूची अंमलबजावणी करावी लागणार आहे. त्यामुळे नव्या पाककृतीची अंमलबजावणी करताना पुरवठा आणि उपलब्ध निधीचे योग्य नियोजन करण्याचे आव्हान संबंधित यंत्रणेसमोर आहे.
चौकट
उपस्थितीवरच स्वयंपाकाचे गणित
शाळेत प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसारच पोषण आहार शिजवावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. अन्नाच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड होऊ नये, याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. तालुक्यांकडून आलेल्या मागणीनुसार तांदूळ व आवश्यक साहित्याचा वेळेत पुरवठा करण्याचे आदेश पुरवठादारांनाही देण्यात आले आहेत.
कोट
नव्या मेनूची काटेकोर अंमलबजावणी करावी
विद्यार्थ्यांना नियमित पोषण आहारातून आवश्यक पोषणमूल्य मिळावे, यासाठी नवीन पाककृतीची अंमलबजावणी करण्यात आली आहे. शाळेत प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसारच आहार शिजवावा आणि अन्नाच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच कडधान्ये व अन्य साहित्याचा पुरवठा वेळेत होऊन नव्या मेनूची काटेकोर अंमलबजावणी करावी.
— कुशल जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर
Post Views: 58
Previous Post

मंगळवेढा आगारात राजमाता जिजाऊ नव्या पाच बसेस दाखल

Next Post

दिपकआबा साळुंखे-पाटील प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या निवडी संपन्न

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
दिपकआबा साळुंखे-पाटील प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या निवडी संपन्न

दिपकआबा साळुंखे-पाटील प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या निवडी संपन्न

ताज्या बातम्या

नूतन  शिक्षणअधिकारी सुहास शिंदे यांचा मनपा प्रा. शिक्षण मंडळात सत्कार

नूतन  शिक्षणअधिकारी सुहास शिंदे यांचा मनपा प्रा. शिक्षण मंडळात सत्कार

September 4, 2026
सिंहगड पब्लिक स्कूलमध्ये दहीहंडी उत्सवाचा जल्लोष

सिंहगड पब्लिक स्कूलमध्ये दहीहंडी उत्सवाचा जल्लोष

September 4, 2026

गणेशोत्सवात डीजे, डॉल्बी व लेझर लाईट ला सक्त मनाई

September 4, 2026
पंढरपूर फलटण रेल्वे मार्गाचा DPR तयार; मंजुरीसाठी पुढील प्रक्रिया सुरू

पंढरपूर फलटण रेल्वे मार्गाचा DPR तयार; मंजुरीसाठी पुढील प्रक्रिया सुरू

September 4, 2026
क्राइम पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विशाल भांगे

क्राइम पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विशाल भांगे

September 4, 2026
श्री सिद्धीविनायक मध्ये बालगोपाळांचा दहीहंडी उत्सव संपन्न

श्री सिद्धीविनायक मध्ये बालगोपाळांचा दहीहंडी उत्सव संपन्न

September 4, 2026
रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

September 4, 2026

अन्यायकारक संच मान्यतेच्या निषेधार्थ शिक्षण आयुक्त कार्यालयाबाहेर शिक्षकांचे आंदोलन

September 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1162542

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!