Wednesday, June 24, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

उद्गरली कोटी कुळे भिमा तुझ्या जन्मामुळे..! रखरखत्या उन्हातही प्रज्ञासूर्यास अभिवादनासाठी लोटला जनसागर !

तरुण भारतbyतरुण भारत
April 15, 2026
in editor
0
उद्गरली कोटी कुळे भिमा तुझ्या जन्मामुळे..! रखरखत्या उन्हातही प्रज्ञासूर्यास अभिवादनासाठी लोटला जनसागर !

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 2621440;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 49;

0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : शहरात भीम जयंती सप्ताहास उत्साही वातावरणात मध्यरात्रीपासून प्रारंभ झाला. यानिमित्ताने अवघे शहर नटले आहे. मध्यरात्रीपासूनच प्रज्ञासूर्यास अभिवादनासाठी जनसागर लोटला होता. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह विविध पक्ष, सामाजिक – संस्था संघटनांच्या वतीने डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. रखरखत्या उन्हातही अभिवादनासाठी मोठी गर्दी झाली होती.

          विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहरात विविध शेकडो मंडळांच्या वतीने मध्यरात्री 12 वाजता डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना सजवलेल्या आकर्षक अशा मंडपामध्ये करण्यात आली. त्रिशरण, पंचशील सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले. शहरात विविध भागांमध्ये विद्युत रोषणाईचा लखलखाट दिसून आला. “जय भीम”च्या गगनभेदी घोषणा देण्यात आल्या.

         महिलांसह अबाल वृद्ध अनुयायांचे जथेंच्या जथें पार्क स्टेडियम जवळील विश्वभूषण डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी मध्यरात्रीपासूनच जनसागर लोटला होता.विविध संस्था, संघटना, राजकीय पक्षांच्या वतीने प्रज्ञासूर्यास अभिवादन करण्यात आले.

“बोलो रे बोलो, जय भीम बोलो”, “ताकत से बोलो, जय भीम बोलो”, “हिम्मत से बोलो, जय भीम बोलो”, “जोर से बोलो, जय भीम बोलो” असा नारा देत हातात निळा झेंडा घेऊन भीम अनुयायी डॉ. आंबेडकर चौकाकडे येत होते. डॉ. आंबेडकर चौक येथील त्यांच्या पुतळ्यास मनोभावे जनसागर नतमस्तक झाला. निळ व गुलालांची मुक्त उधळण करण्यात आली. उत्साही वातावरणात भीम जयंती सप्ताह प्रारंभ झाला.

   यावर्षी दिनांक 14 ते 19 एप्रिल 2026 दरम्यान भीम जयंती सप्ताह साजरा करण्यात येत आहे. रविवार दि.19 एप्रिल 2025 रोजी भीम जयंती सप्ताहाची भव्य अशा विराट मिरवणुकीने सांगता होणार आहे. या जयंती सप्ताहास उत्साही वातावरणात मध्यरात्री 12 वाजल्यापासून प्रारंभ झाला. सुमारे 450 मंडळांनी आकर्षक सजवलेल्या व विद्युत रोषणाईने नटलेल्या मंडपामध्ये डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना मध्यरात्री केली. जयंतीनिमित्ताने अवघे सोलापूर शहर नटले आहे. दोन्ही मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने विश्वस्त समिती व पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले.

          भीम जयंती निमित्त आज सकाळपासूनच पार्क स्टेडियम जवळील विश्वभूषण डॉ. आंबेडकर यांचा पुतळा आणि मिलिंद नगर येथील भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार प्रेरणाभूमी येथे अभिवादनासाठी अलोट गर्दी झाली होती. त्रिशरण – पंचशील सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन  अनुयायांनी अभिवादन केले.  सकाळी  समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. तसेच भारतीय बौद्ध महासभेअंतर्गत समता सैनिक दलाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. विविध पक्ष, सामाजिक – संस्था संघटनांच्या वतीने डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. 

         छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या वतीने मध्यरात्री प्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात आली. विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीत सन 1955 मध्ये रेखाटलेल्या प्रतिमेची या मंडपात प्रतिष्ठापना करण्यात येते. त्रिशरण पंचशील सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी सतीश सरवदे, ॲड. अश्विन बनसोडे, डॉ. शैलेश सुरते, किरण जाधव,  तळभंडारे, 

  सुरज आबुटे,  सिद्धार्थ तळभंडारे , बाळू गायकवाड, मनीष तळभंडारे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 पुस्तकांसह विविध स्टॉल्सवर गर्दी 

डॉ. आंबेडकर चौकात पुस्तक, तथागत बुद्ध, डॉ. आंबेडकर यांची मूर्ती, कॅलेंडर , टोप्या व इतर चळवळीतील साहित्यांच्या विविध स्टॉल्सवर खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. या स्टॉल्सवर मोठ्या प्रमाणात पुस्तक विक्री झाली असल्याचे दिसून आले. 

पालकमंत्र्यांसह पदाधिकाऱ्यांनी केले अभिवादन 

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी त्यांच्या समवेत आ. देवेंद्र कोठे, आ. सचिन कल्याणशेट्टी, महापौर विनायक कोंड्याल, समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे, नगरसेविका रोहिणी तडवळकर, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य शहाजी पवार , नगरसेवक गणेश वानकर , किसन जाधव, माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, रॉकी बंगाळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

जयंतीचा उत्साह केवळ प्रत्यक्षातच नव्हे तर सोशल मीडियावरही दिसून आला.फेसबुक , इंस्टाग्राम , (ट्विटर) आणि व्हाट्सअँप स्टेटसवर दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव झाला. प्रत्येकजण बाबासाहेबांच्या विचारांचे संदेश शेअर करत जयंती साजरी करत होता.

निळे फेटे, झेंडे घेऊन तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग

जयंतीनिमित्त तरुणाई मोठ्या अभिवादनासाठी येत होते. निळे फेटे, झेंडे, बाबासाहेबांचे फोटो असलेले टी-शर्ट परिधान करून तरुण-तरुणींनी अभिवादन केले. या उत्स्फूर्त सहभागामुळे परिसरात विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

सह्यांची मोहिम व मोफत सिम वितरण

अनुसूचित जाती उपवर्गीकरणाला विरोध दर्शवण्यासाठी पुतळा परिसरात सह्यांची मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच भारत संचार निगम लिमिटेडच्या वतीने जयंतीनिमित्त मोफत सिम कार्डचे वितरण करण्यात आले.

शेकडो पोलिसांचा चोख बंदोबस्त

जयंतीनिमित्त कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी सोलापूर शहर पोलीसांनी संपूर्ण शहरात कडक बंदोबस्त ठेवला होता. प्रमुख ठिकाणी पोलिसांची मोठी फौज तैनात करण्यात आली होती.

सामाजिक उपक्रमांनी अभिवादन

विविध संस्था व मंडळांच्या वतीने रक्तदान शिबिरे, १८ तास अभ्यास उपक्रम आदी कार्यक्रम राबवून डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. समाजातील सर्व घटकांनी यात सहभाग घेतला.

Post Views: 33
Previous Post

डॉ. बाबासाहेबांना सोलापुरात तीन वेळा मानपत्र प्रदान

Next Post

श्री भगवंत महोत्सव २०२६ च्या मुख्य रंगमंचाचे भूमिपूजन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
श्री भगवंत महोत्सव २०२६ च्या मुख्य रंगमंचाचे भूमिपूजन

श्री भगवंत महोत्सव २०२६ च्या मुख्य रंगमंचाचे भूमिपूजन

ताज्या बातम्या

सलीम खान संघाचा दास्ताने संघावर शानदार विजय

सलीम खान संघाचा दास्ताने संघावर शानदार विजय

June 23, 2026

वारीपूर्व नियोजनाला वेग; जि.प.ची सभा पंढरपुरात घेण्याचा प्रस्ताव अध्यक्षांच्या टेबलावर  

June 23, 2026

राज्यस्तरीय महानगरपालिका विशेष शिक्षक चर्चासत्र उत्साहात संपन्न

June 23, 2026
संग्राम दोस्ती गणेश मंडळाच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

संग्राम दोस्ती गणेश मंडळाच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

June 23, 2026
सोलापूर विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे राजेंद्र राऊत यांच्या विजयाचा पिलीव येथे भाजपच्या वतीने जल्लोष

सोलापूर विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे राजेंद्र राऊत यांच्या विजयाचा पिलीव येथे भाजपच्या वतीने जल्लोष

June 23, 2026

“बालसुरक्षेसाठी दुहेरी आरोग्य कवच’; अतिसारमुक्त बालपणसह पोलिओमुक्त भविष्याकडे सोलापूरची वाटचाल 

June 23, 2026

पोलिओचा धोका शून्यावर’ ठेवण्यासाठी जिल्हा सज्ज

June 23, 2026
खाशाबा जाधव पुरस्काराने ऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील गौरवित

खाशाबा जाधव पुरस्काराने ऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील गौरवित

June 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0932579

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697