सोलापूर : शांती एज्युकेशन सोसायटी संचलित ए. जी. पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट, सोलापूरच्या यांत्रिकी अभियांत्रिकी विभागामार्फत तसेच Indian Institution of Production Engineers, Bengaluru यांच्या संयुक्त विद्यमाने “Advances in Foundry Technology” या विषयावरील तीन दिवसीय शिक्षक विकास कार्यक्रम (Faculty Development Program) यशस्वीरित्या संपन्न झाला.
देशभरातील पॉलिटेक्निक व अभियांत्रिकी महाविद्यालयांतील प्राध्यापकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी भारतभरातून 224 शिक्षकांनी नोंदणी केली. Foundry क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, उद्योगातील नव्या संधी, संशोधनातील प्रगती आणि शाश्वत गतिशीलतेविषयी सखोल माहिती देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. चौगुले यांनी सहभागी प्राध्यापकांना शिक्षक विकास कार्यक्रमासाठी संभोधित व उत्तेजित केले; तसेच Indian Institution of Production Engineers, Bengaluru सेंटरचे सचिव डॉ. Bramha Raju Sir यांनी सहभागी प्राध्यापकांना मार्गदर्शन केले, त्यांनी तंत्रज्ञानातील सातत्याने होणारे बदल आत्मसात करण्यासाठी अशा शिक्षक विकास कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
पहिल्या दिवशी NIAMT, Ranchi चे Dr. Kamlesh Kumar Singh Sir यांनी Casting Design and Simulation या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी Casting Design ची पद्धत व Simulation या विषयावर मार्गदर्शन केले.
त्यानंतर NIFFT, Ranchi चे Dr. Amitesh Kumar Sir यांनी Sand Moulding & Core making Techniques या विषयावर व्याख्यान दिले. त्यांनी Sand Moulding & Core making Techniques चे पद्धत व त्याचे प्रकार स्पष्ट केले.
दुसऱ्या दिवशी Er. Shekhar Jeurkar Sir, Solapur यांनी Safety in Foundry Insustries या विषयावर मार्गदर्शन करताना सविस्तर चर्चा केली व Foundry मध्ये अपघात कसे कमी करता येईल याचे मार्गदर्शन केले.
त्यानंतर श्री. अरविंद देशमुख सर, इचलकरंजी यांनी Melting Practices & Melting Charge Calculations या विषयावर मार्गदर्शन केले. या सेशनमध्ये Melting Furnaces & Melging Charge Calculations वर चर्चा केली.
तिसऱ्या दिवशी श्री अरविंद देशपांडे सर, कोल्हापूर यांनी पहिल्या व दुसऱ्या सत्रात New Product Devlopment व Defeet Analysis & Remedies in Casting यावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री सिद्धेश्वर पाटील, संस्थेचे सचिव श्री शिवानंद सिद्धेश्वर पाटील तसेच संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. चौगुले व उपप्राचार्य श्री एस. के. मोहिते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे समन्वयक श्री. जे. जी. मुल्ला यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. यांत्रिकी विभाग प्रमुख श्री. आर. एस. मॊटगी, श्री. बी. ई. नरोटे, श्री. जे. पी. पिंजर, श्री. व्ही. जी. आंबिगर आणि श्री. आर. पी. इलकल यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.
समारोप प्रसंगी उपप्राचार्य श्री. एस. के. मोहिते यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. सहभागी शिक्षकांनी कार्यक्रमातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, उद्योगाभिमुख माहिती आणि विषयांची उपयुक्तता याबद्दल समाधान व्यक्त केले.






















