सोलापूर – येथील श्री हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या व्दैवार्षिक निवडणुकीत पाचजणांची संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
वाचनालयाच्या या निवडणुकीत पाच जागांसाठी एकूण आठजणांनी आपले उमेदवारी अर्ज भरले होते. परंतु, वाचनालयाचे ज्येष्ठ संचालक ॲड. धनंजय माने यांच्या मध्यस्थीने त्यातील दत्ता भोसले, रजनीश जोशी आणि प्रा. डॉ. शिवाजीराव देशमुख या तिघांनीही माघार घेतली. त्यामुळे 19 जुलै रोजी झालेल्या वाचनालयाच्या वार्षिक सभेत पाचजणांची संचालक म्हणून निवड जाहीर करण्यात आली.
निवड झालेल्यांमध्ये प्रा.डॉ.श्रीकांत येळेगावकर, मोहन सोहनी,प्रा. सुलभा पिशवीकर, प्रा. डॉ. नभा काकडे आणि प्रा .नागनाथ नवगिरे यांची पुढील सहा वर्षांसाठी संचालक म्हणून निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून माजी प्राचार्य के. एम. जमादार यांनी काम पाहिले. या सर्व नूतन संचालकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Post Views: 16