सोलापूर – सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने यंदापासून सुरू करण्यात आलेल्या १२ वर्षांखालील मुलांच्या ‘लिटल चॅम्प’ क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ इंदिरा गांधी पार्क स्टेडियम येथे अत्यंत उत्साहात पार पडला.
पारितोषिके सेवानिवृत्त एसीपी दीपक आर्वे, डॉ. अतुल कुलकर्णी, डॉ. सुमित मोरे व मनोज भागवत यांच्या हस्ते देण्यात आली. सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप माने, चेअरमन रणजीतसिंह मोहिते-पाटील, व्हाईस चेअरमन श्रीकांत मोरे व सचिव खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित केली होती.
दिवंगत खेळाडूंना आदरांजली व १४ विशेष संघ
या स्पर्धेत एकूण २०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला. त्यांचे प्रत्येकी १४ संघ तयार करून, सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनसाठी भरीव कामगिरी केलेल्या दिवंगत खेळाडूंची नावे देऊन त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यात उमेश दास्ताने, खुद्दूस खान, सलिम खान, श्रीनिवास शिवाल, चंदू खांडिलकर, वासू मुदलियार, चंदू पवार, सातोस्कर बंधू , फैज कादरी, रामभाऊ देगांवकर, कादर विजापूरे, अंबादास पवार, हेमंत हबीब आणि डॉ. देशपांडे या दिवंगत खेळाडूंच्या नावांवरून संघांचे नामकरण करण्यात आले होते.
ही स्पर्धा जुळे सोलापूर येथील भंडारी मैदानात पार पडली असून, स्पर्धा यशस्वी करण्यासाठी निवड समितीचे चेअरमन अनिल सामानी, योगेश कौंपल, राजेश येमुल, मुस्ताक खैरटकर, आनंद शेलार, सुनील शिंदे, निलेश गायकवाड, सचिव श्री. चंद्रकांत रैबर्सू आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक श्री. सुनील मालप यांनी केले.स्पर्धेचा आढावा राजेंद्र गोटे सर यांनी घेतला तर संतोष बडवे यांनी आभार मानले.
खेळाडूंना मार्गदर्शन
- श्री. दीपक आर्वे यांनी विद्यार्थ्यांना खेळाडू वृत्ती कशी जोपासावी याविषयी मार्गदर्शन केले.
- डॉ. अतुल कुलकर्णी यांनी मुलांना क्रिकेटचा आनंद लुटत उत्तम खेळ खेळण्याचे आवाहन केले.
- डॉक्टर सुमित मोरे यांनी लहान वयात मिळालेल्या या संधीचा फायदा घेऊन खेळात प्राविण्य मिळवण्याचा सल्ला दिला.

















