सोलापूर – प्रज्ञा निकेतन एज्युकेशन सोसायटी संचलित एन. के. ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त फुटबॉल व क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले आहे.
हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ. बी.के. सोनगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य डॉ. एस. एस. मेतन, सिनेट व व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. सचिन गायकवाड, क्रीडा समन्वयक प्रा
ए. एस. जामदार , प्रा आर. आर. श्रीराम यांची प्रमुख उपस्थिती होती.
भारतीय हॉकी संघाला मिळालेला कोहिनूर म्हणजे मेजर ध्यानचंद होय. त्यांच्यामुळे भारतीय हॉकी संघास तीन ऑलिंपिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवता आले. प्रखर राष्ट्रभक्ती, खिलाडूवृत्ती, सांघिक भावना, खेळातील सातत्य हे मेजर ध्यानचंद यांच्या प्रभुत्वाची मुख्य कारणे होत, त्यांच्या प्रभावामुळे 1928 ते 1964 पर्यंत भारताने हॉकीमध्ये जागतिक स्पर्धेत आपला दबदबा कायम ठेवला, अशा महान खेळाडूचा जन्मदिवस खेळाडूंनी उत्साहात साजरा केला पाहिजे, असे प्राचार्य सोनगे म्हणाले.
फुटबॉलच्या झालेल्या सलामीच्या सामन्यात सीनियर संघावर ज्युनिअर संघाने 3-2 फरकाने विजय मिळविला.
क्रिकेट सामन्यात मेकॅनिकल विभागाचे 107 रनाचे लक्ष्य सिव्हिल विभागाने 8 ओव्हरमध्ये पूर्ण करत विजय मिळवला.
—–
Post Views: 108