मुखेड प्रतिनिधी :- ऍड. रणजित जामखेडकर
भारतीय बौद्ध महासभा मुखेड तालुका कार्यकारिणी निवडीसाठी शासकिय विश्रामग्रह मुखेड येथे दि . २३ जून रविवारी सकाळी ११.३० वा बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये निवडीसाठी जिल्हाध्यक्ष पि.एम वाघमारे,जिल्हा संघटक हौसाजी वारघडे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीची सुरुवात तथगात भगवान बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्रिसरण पंचशिल घेण्यात आले पहिल्या सत्रात मागील कार्य अहवाल घेण्यात आला
दुसऱ्या सत्रात प्रत्यक्ष निवड प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली प्रत्यक्ष या संस्थेत काम करण्याची इच्छा अस नाऱ्यांनी आपली नावे नोंदविली त्यातून सर्वानुमते चर्चा करून बिनविरोध कार्यकारणी जाहीर करण्यात आली
तालुका अध्यक्ष – गंगाधर सोंडारे बावलगावकर
सरचिटणीस – कुलदिप कोतापले -कोषाध्यक्ष -अविनाश कांबळे संस्कार उपाध्यक्ष – दिपक लोहबंदे सर सचिव उत्तम गवळे . जयकुमार बिलाळीकर उपाध्यक्ष पर्यटन – रघुनाथ जोंधळे सचिव – अक्षय गायकवाड पवन कांबळे
उपाध्यक्ष संरक्षण – संतोष गवळे सचिव मिलींद कांबळे कमलाकर घोडके कार्यालयीन सचिव – नितीन गायकवाड हिशोब तपासणीस -रवि सोनकांबळे संघटक नागशेन लोहाळे,यादव कांबळे यांची निवड करण्यात आली.
या निवड कार्यक्रमास के.एच हसनाळकर, प्रा. वाय.एच कांबळे, ॲड संजय भारदे, मोहन गवळे, इंजी राजेंद्र वाघमारे, पि.एस कांबळे, ए. बी.गायकवाड ,अशित भारदे,विजय लोहबंदे वसंत सोनकांबळे, उमेश गवळे, सुनिल सोनकांबळे ,शिलव नरवाडे, सुमेध सोंडारे यांच्या सह शहरातील व ग्रामीण भागातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.