हदगाव तालुका प्रतिनिधी:-
भाजपा पक्षाच्या हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाच्या संयोजक पदासाठी हदगाव शहरातील भाजपाचे जुने व सक्रिय कार्यकर्ते मागच्या तीन दशकापासून पक्षासाठी वाहून घेतलेले तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक, वि.का.से सोसायटीचे माजी संचालक, भाजपाचे युवा सरचिटणीस ,माजी भाजपाचे शहराध्यक्ष व सध्या तालुका सरचिटणीस पदावर कार्यरत असलेले उमाकांत भोरे हे या पदासाठी इच्छुक असून लवकरच यासंबंधी जिल्ह्यातील वरिष्ठ पदाधिकारी यांची भेट घेणार असल्याची त्यांनी यावेळेस सांगितले.
मागच्या काही दिवसांपूर्वीच सूर्यकांता पाटील यांनी आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा तथा हदगाव- हिमायतनगर संयोजक पदाचा राजीनामा दिला असून या ठिकाणी आता जिल्हा पातळीवरून या जागी सक्षम व प्रभावी जुन्या कार्यकर्त्यांनाच संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. त्यातच मागच्या तीन दशकापासून भाजपा पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते राहिलेले उमाकांत भोरे हे या पदासाठी इच्छुक असून त्यांच्याकडे पक्ष संघटन व पक्षाच्या मागच्या तीन दशकाचा अनुभव असून पक्ष याचा नक्कीच विचार करेल
असा विश्वास देखील त्यांनी यावेळी दर्शविला. पक्षाने जर या पदावर काम करण्याची संधी दिली तर आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ,जिल्हा परिषद निवडणूक तथा पंचायत समिती निवडणूक असो यात पक्षाला घवघवीत यश प्राप्त करण्यासाठी अथक परिश्रम तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सहकार्याने यश नक्कीच प्राप्त करू तसेच पक्ष संघटना वाढविण्यास याचा निश्चितच हदगाव- हिमायतनगर तालुक्यात भाजपा पक्षाचे प्राबल्य वाढल्याशिवाय राहणार नाही असा आत्मविश्वास देखील त्यांनी यावेळेस व्यक्त केला.