सोलापूर – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक मा.आ. थोटा लक्ष्मीकांत राव, प्रदेश निरीक्षक खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सांगलीत काँग्रेसच्या “संघटन सृजन अभियान” अंतर्गत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न होतोय. याप्रसंगी उपस्थित राहून कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने देशभरात ‘संघटन सृजन अभियान’ हाती घेतले असून, महाराष्ट्रात हे अभियान पक्षाला तळागाळापर्यंत मजबूत करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
धर्मा-धर्मात वाद निर्माण करून, समाजात फूट पाडून आणि कपटकारस्थान रचून आज सत्ताधारी सत्तेत पोहोचले आहेत. अशा विभाजनकारी राजकारणाला बळी न पडता सर्वसमावेशक विकास, सामाजिक सलोखा आणि लोकशाही मूल्ये जपण्याचा मार्ग स्वीकारणे ही काळाची गरज आहे. काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीप्रमाणे सर्व धर्म, जाती आणि घटकांना समान न्याय देत, जनतेच्या प्रश्नांवर ठोसपणे काम करण्यासाठी कार्यकर्त्यांनी अधिक सक्रिय राहिले पाहिजे. संघटन अधिक मजबूत करून जनतेचा विश्वास जिंकत, प्रगत आणि सर्वसमावेशक समाज घडवण्याचा हा लढा आपल्याला प्राणपणाने लढायचा आहे. यासाठी या अभियानाच्या माध्यमातून सिद्ध होऊया !
याप्रसंगी खा. विशालदादा पाटील, मा. आ. दीप्ती चौधरी, मा. आमदार विक्रमसिंहदादा सावंत, श्री. राजेंद्र शेलार, अॅड. अमित करांडे, श्री. अजित दरेकर, श्रीमती शैलजाभाभी पाटील, श्री. राजेश नाईक, डॉ. जितेश कदम तसेच इतर मान्यवर, पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


























