कंदलगाव – ता. दक्षिण सोलापूर येथील जीवनज्योत माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेतील विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी व बारावी (कला शाखा) बोर्डाच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले. इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल ७३.६८ टक्के लागला असून, कु. शिवानी दीपक जाधव हिने ८७.४० टक्के प्रथम, कु. महेक मुकंदर शेख हिने ८४.६० टक्के व्दितीय तर कु. ऋतुजा बाळासाहेब यलगोंडे हिने ८२.८० टक्के गुण प्राप्त करत तृतीय क्रमांक पटकाविला. तर इयत्ता बारावी कला शाखेचा निकाल ७१.९३ टक्के लागला. यामध्ये कु. प्रतीक्षा विठ्ठल वाघमोडे हिने ८५.६७ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कु. ऐश्वर्या चंद्रकांत जमादार हिने ७४.१७ टक्के तर कु. अक्षता अर्जुन डोळ्ळे हिने ७३.०० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकाविला.
या उज्ज्वल यशाबद्दल सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळ संस्थेचे अध्यक्ष मा. पी. एल. कोळी साहेब, उपाध्यक्ष डॉ. चनगोंडा हविनाळे, उपाध्यक्ष संदेश कोळी, सचिव एम. डी. कमळे, सहसचिव सुबोध कोळी, विश्वस्त नागेश बिराजदार व संसथेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य पी. एम. कमळे, पर्यवेक्षक आर. बी. यलगोंडे, सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी, सरपंच शारदाताई कडते, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष संजय कोले, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ जोकारे, विश्वनाथ जोकारे व प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
फोटो ओळ : यशस्वी विद्यार्थिनींसोबत संस्थेचे सहसचिव सुबोध कोळी, प्राचार्य पी. एम. कमळे, पर्यवेक्षक आर. बी. यलगोंडे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष संजय कोले, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ जोकारे, विश्वनाथ जोकारे, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी.


























