सोलापूर – ए. जी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोलापूर येथे दोन दिवसीय राष्ट्रीयस्तरावरील AGTechathon 2.0 या हॅकाथॉन स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत देशभरातील विविध महाविद्यालयांमधून ९५ हून अधिक टीम्सनी सहभाग घेतला. यामध्ये प्रामुख्याने AI, IoT, सायबर सुरक्षा, कृषी, आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील समस्यांवर नाविन्यपूर्ण डिजिटल सोल्यूशन्स सादर केली गेली. यामध्ये विद्यार्थ्यांनी सतत २४ तास प्रॉब्लेम स्टेटमेंट्स वर काम केले.
सदर स्पर्धा दोन टप्प्यात घेण्यात आली. पहिल्या फेरीत देशभरातून सुमारे ९५ संघांनी सहभाग नोंदवला त्यात प्रामुख्याने दिल्ली, हैद्राबाद, तामिळनाडू,कर्नाटक, महाराष्ट्र यांचा समावेश होता.दुसऱ्या फेरीसाठी ३० संघांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे उदघाटन संस्थेचे माननीय अध्यक्ष श्री. एस. ए. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. प्राचार्य डॉ. व्हि. व्हि. पोतदार सर व कॅम्पस डायरेक्टर डॉ. एम. ए. चौगुले यांचे सक्रिय मार्गदर्शन लाभले. त्यांनी विद्यार्थ्यांना स्टार्टअप संस्कृतीचा स्वीकार करून नवउद्योजक होण्यासाठी प्रेरणा दिली.
या कार्यक्रमाचे आयोजन संगणक विभागातील कोड क्लब अंतर्गत करण्यात आले होते. मुख्य समन्वयक प्रा. एस. व्हि. कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा. एम. एन. देशमुख व प्रा. ए. बी. हन्नूरे यांनी co-ordinator म्हणून काम पाहिले.
स्पर्धेचे परीक्षण डॉ. उदय बळगार व डॉ. सुजाता तेरडाळ यांनी केले. प्रथम क्रमांक ग्रामीण टेकनिकल अँड मॅनॅजमेण्ट कॅम्पस विष्णुपुरी नांदेड मधील Team -Samay या संघाने पटकवला , द्वितीय क्रमांक विश्वकर्मा इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि पुणे येथील Goal- Diggers या संघाने पटकवला तर तृतीय क्रमांक अजिंक्य डी वाय पाटील कॉलेज लोहगाव पुणे महाविद्यालयातील Mech- Guard या संघाने पटकवला. विजेत्या संघांना रोख पारितोषिके, ट्रॉफी व सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. निवडक प्रोजेक्ट्सना पुढील स्टार्टअप व इन्क्युबेशनसाठी निवडण्यात येणार आहे.
AGTechathon या हॅकथोन स्पर्धेची सुरुवात २०२५ पासून करण्यात आली.
प्राचार्य डॉ. व्ही. व्ही.पोतदार यांनी सांगितले की AGTechathon 2.0 हे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेस चालना देणारे व्यासपीठ असून, हे व्यासपीठ उद्याचे नवउद्योजक घडवते.
कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडण्यासाठी विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.
Post Views: 30